News Flash

झोपताना ‘या’ तीन गोष्टी असतात करीनाच्या सोबत…”वाईनची बाटली, पजामा आणि….!”

एका शोदरम्यान तिने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

करीना कपूर खान सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती आपल्या चाहत्यांसोबत आपले आणि आपल्या परिवाराचे फोटो शेअर करत असते. तिचा मुलगा तैमूरही कायम चर्चेचा विषय असतो. आता काही दिवसांपूर्वीच तिने दुसऱ्या बाळालाही जन्म दिला आहे. यानंतर आता तिने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

एका महिन्यापूर्वीच तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर तिने काही काळ कामातून विश्रांती घेतली होती. आता ती पुन्हा ‘स्टार व्हर्सेस फुड’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या एका खास एपिसोडमध्ये ती पिझ्झा बनवताना दिसणार आहे. या दरम्यान ती तिच्या गरोदरपणातले अनुभव सांगणार आहे. तिला या काळात सर्वात जास्त पिझ्झा आणि पास्ता खाण्याची इच्छा होत होती असंही ती म्हणाली.

या बद्दल बोलताना ती म्हणते, “मला गरोदरातपणात कायम पिझ्झा आणि पास्ता खाण्याची इच्छा होत होती. हे माझा मुलगा आणि पती या दोघांसाठीही विचित्र होतं.” जेव्हा तिला विचारलं की तिच्या घरातलं किचन कोण सांभाळतं तेव्हा तिने सांगितलं, “तैमूर आणि सैफला ते फार आवडतं. त्यांना किचनमधलं काम करायला फार आवडतं. आणि माझ्याकडे संगीताची जबाबदारी आहे. त्या दोघांनाही जॅझ संगीत ऐकायला आवडतं.”

करीनाने आपल्या परिवाराच्या खाण्याच्या आवडीनिवडींविषयीही सांगितलं.तिने या भागामध्ये तान्या, शिबानी आणि अंशुका या आपल्या मैत्रिणींशी गप्पाही मारल्या आहेत. यात ती झोपताना कोणत्या तीन गोष्टी जवळ बाळगते याविषयीही खुलासा केला आहे. तिला असा प्रश्न विचारण्यात आला की, “तू झोपताना कोणत्या तीन गोष्टी जवळ बाळगतेस?” याला उत्तर देताना ती म्हणाली, “वाईनची बा़टली, पजामा आणि सैफ अली खान! ”

करीनाने या शोचा टीझरही नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा टीझऱ शेअर करताना तिने कॅप्शनही दिलं आहे. यात ती म्हणते, “जे कोणी कपूर खानदानाला ओळखतात त्यांना चांगलंच माहित आहे की आम्ही कपूर खाण्याचे किती शौकिन आहोत.”
‘स्टार्स व्हर्सेस फुड’ हा शो डिस्कव्हरी प्लस या वाहिनीवर १५ एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये करण जोहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, प्रतिक गांधी हे कलाकारही दिसणार आहेत. करीना लवकरच आमीर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातही दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 4:27 pm

Web Title: kareena kapoor says she carries 3 things to bed vsk 98
Next Stories
1 असं आहे मलायका अरोराचं ‘वर्क फ्रॉम होम’; फोटो शेअर करत चाहत्यांना म्हणाली…
2 “मसाबा गुप्ता की ‘कराटे किड’मधला जेडन स्मिथ?’ चाहत्यांचा पडला प्रश्न!
3 ‘आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…’, मुलाच्या आत्महत्येवर कबीर बेदींचा खुलासा
Just Now!
X