News Flash

करीना कपूरचा दुसरा मुलगा ‘जेह’चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल; चाहते म्हणाले…

करीना कपूरच्या 'करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल' या पुस्तकाच्या नावावरून वाद निर्माण झालाय.

(Photo-instagram@kareenakapoorkhan)

अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या ‘प्रेग्नेंसी बाइबल’ या पुस्तकामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ९ जुलैला करीनाचं हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. मात्र त्यानंतर पुस्तकाच्या नावावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. सोशल मीडियावर देखील करीनावर टीका करण्यात आलीय. यातच आता ‘प्रेग्नेंसी बाइबल’ या करीनाच्या पुस्तकातील तिच्या दुसऱ्या मुलाचे फोटो लीक झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर करीना कपूरचे बाळासोबतचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. करीनाच्या या फोटोतील बाळ तिचा दुसरा मुलगा ‘जेह’ असल्याचं म्हंटलं जातंय. शिवाय हे फोटो या पुस्तकातील असल्याच्या चर्चा आहेत. करीनाच्या अनेक फॅन ग्रुपवरदेखील हे फोटो व्हायरल होत आहेत.

करीना आणि सैफने अद्याप त्यांच्या दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूरच ठेवलं आहे. त्यामुळे सैफिनाच्या दुसऱ्या बाळाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशात व्हायरल झालेल्या फोटोंमुळे आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांनी हा चिमुकला ‘जेह’ असल्याचं म्हंटलं आहे.

हे देखील वाचा: ‘तिसऱ्या मुलाच्या’ नावावरून करीना कपूरच्या अडचणी वाढण्याची शक्यता!

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

करीना कपूरच्या एका फॅनपेजवर करीनाचा बाळासोबत एक क्यूट फोटो शेअर करण्यात आलाय. या फोटच्या कॅप्शनमध्ये म्हंटलंय, “आम्हाला तिच्या पुस्तकात न पाहिलेले फोटो मिळाले. पहिला फोटो तैमूर आणि दुसरा जेहचा आहे.”

हे देखील वाचा: दोन महिन्यांपूर्वीच दिया मिर्झा झालीय आई पण…

हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एवढचं नव्हे तर अनेक चाहत्यांनी या फोटोवर ‘क्यूट’ अशा कमेंट करत करीनाच्या फोटोला पसंती दिलीय. तर काही नेटकऱ्यांनी “जेह तैमूर सारखाचं गोड आहे.” अशा कमेंट केल्या आहेत.

दरम्यान करीना कपूरच्या ‘करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकाच्या नावावरून वाद निर्माण झालाय. एका ख्रिश्चन गटाने अभिनेत्री करीना कपूरने लिहिलेल्या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत समाजातील धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत तिच्यासह दोन जणांविरोधात बुधवारी तक्रार देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बीडमध्ये पोलिसांकडे ही तक्रार दिली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 4:24 pm

Web Title: kareena kapoor second son jeh photo from her book pregnancy bible goes viral on social media kpw 89
Next Stories
1 Video: गाडी बंद न करताच हृतिक खाली उतरला अन्….
2 ‘ये दिल मांगे मोअर’, अंगावर रोमांच उभे करणारा कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्यावर आधारीत ‘शेरशाह’चा टीझर प्रदर्शित
3 वडिलांच्या कवितांचे रेकॉर्डिंग करत आहेत बिग बी; सोशल मीडियावर शेअर केला फोटो
Just Now!
X