News Flash

अभिनेत्री करीना कपूर लसीकरण मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर

एक आई म्हणून माझ्यासाठीही या मोहिमेचे महत्त्व आहे असे मत करीना कपूरने व्यक्त केले

करिना कपूर खान

अभिनेत्री करीना कपूरने एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. लसीकरणाच्या मोहिमेची ती ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे. या माध्यमातून ती लसीकरणाबाबत जनजागृती करणार आहे. लसीकरणाच्या जनजागृतीसाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. करीना कपूर याच मोहिमेचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

सीरमतर्फे चालवण्यात येणाऱ्या मोहिमेचा कालावधी वर्षभराचा आहे. समाजातील वंचित गटांमध्ये लसीकरणाचे महत्त्व आणि त्यांची गरज पोहचावी यासाठी करीना कपूर जनजागृती करताना दिसणार आहे. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर पोलिओ आणि देवी यांसारख्या रोगांचं उच्चाटन हे लसीकरणामुळेच शक्य झालं आहे. असं असलं तरीही इतर काही आजारांमुळेही गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. गोवर, घटसर्प यांसारख्या आजारांमुळे मुलं किंवा गर्भवती स्त्रियांचा मृत्यू होतो. यामुळेच सीरम इन्स्टिट्युटने यासंदर्भातला पुढाकार घेतला आहे.

एक आई म्हणून माझ्या मुलाला धोकादायक आजारांपासून दूर ठेवण्याचं महत्त्व काय असते ते मला ठाऊक आहे. त्यामुळे माझ्यासाठीही सीरमने सुरु केलेली ही मोहीम महत्त्वाची आहे. लस मिळण्याची उपलब्धता आणि त्यांचा न परवडणारा खर्च यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू होतात मात्र या मोहिमेच्या माध्यमातून पालकांमध्ये जनजागृती केली जाऊ शकते असे मत करीना कपूर खानने व्यक्त केले आहे.

लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करून त्या लशी मुलांसाठी किती आवश्यक असतात हे सांगण्यासाठी, समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही ही मोहीम हाती घेतल्याचे सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 3:35 am

Web Title: kareena kapoor selected as a brand ambassador of vaccination campaign serum institute pune
Next Stories
1 १९ पुलांना नवसंजीवनी
2 वाहनचालक परवान्याची मागणी क्षमतेच्या तिप्पट
3 प्रश्न विद्यार्थ्यांचे, उत्तरे नारळीकर सरांची!
Just Now!
X