News Flash

पहा आता तैमूरला करावं लागतंय घरातलं काम!; लहान भावासाठी काय पण…

तैमूर बनला शेफ

बॉलिवूडमधील स्टार किड्सपैकी सध्याच्या घडीला सर्वात जास्त लोकप्रिय आहे तो म्हणजे सैफिनाचा पहिला मुलगा तैमूर. सोशल मीडिावर तैमूरला सर्वात जास्त पसंती मिळताना दिसते. तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

करीनाने नुकताच दुसऱ्या बाळाला जन्म दिला. मात्र दुसऱ्या बाळाला तिने मीडियापासून दूरच ठेवण्याचा निर्णय घेताय. त्यामुळे सध्या तरी करीना तैमूरचे फोटो शेअर करताना दिसतेय. नुकताच करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमूरचा एक फोटो शेअर केला आहे. काही मिनिटांमध्येच तैमूरचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तैमूरच्या हाता एक ट्रे दिसतोय. या ट्रेमध्ये चिमुकल्या तैमूरने बाहुल्यांच्या आकाराची बिस्किटं बनवल्याचं दिसतंय. ही कुकिस् बेक करण्यासाठी तयार आहेत. या फोटोला करीनाने एक कॅप्शन दिलंय. ” एकाच फ्रेममध्ये माझ्या आयुष्यातील पुरुष.. खूप छान दिसतंय हे” अशा आशयाचं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय. तसचं “शेफटीम”, “फेव्हरेटबॉय” असं हॅशटॅग तिने तिच्या लाडक्या तैमूरसाठी दिलंय.

तैमूरने चार वेगवेगळ्या आकारत ही बाहुल्यांच्या आकाराची बिस्किटं बनवल्याचं दिसतंय. त्याने यातून त्याच्या कुटुंबाचं चित्र उभं केलंय. यात दोन मोठी बिस्किटं तर एक लहान आणि एक अगदी लहान बिस्किट बनवलं आहे, हे कुकीस् तैमूरने त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या भावासाठी बनवल्याचं दिसतंय.
करीनाने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत तैमूरचं कौतुक केलंय. तर हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय़. काही दिवसांपूर्वीच महाशिवरात्री निमित्ताने तैमूरला महादेवाचं रुप देण्यात आलं होतं. कपाळावर भस्म लावलेल्या तैमूरचा फोटो यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 1:45 pm

Web Title: kareena kapoor shares taimur photo as he become chef holding cookies he made kpw 89
Next Stories
1 “तू मिस वर्ल्ड आहेस म्हणून काय झाल?”; कोरिओग्राफरने प्रियांकावर फेकला होता माईक
2 तिचे अनेक रिपोर्ट निगेटिव्ह आलेत, गौहर खानच्या टीमचं स्पष्टीकरण
3 दीपिका, कार्तिकच्या या मौल्यवान गोष्टींवर जान्हवीचा डोळा! काय आहे सत्य?
Just Now!
X