News Flash

छोट्या नवाबचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा

करीनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आज ‘International Mother’s Day’ म्हणजे ‘जागतिक मातृदिन’ त्या निमित्ताने मुलं त्यांच्या आईला शुभेच्छा देत असतात. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूरने तिच्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर करत सगळ्यां आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तैमूर आणि त्याचा छोटा भाऊ दिसतं आहे. तैमूरने त्याच्या छोट्या भावाल पकडले आहे. हा फोटो शेअर करत “आज संपूर्ण जग आशेवर अवलंबून आहे, आणि हे दोघे येणारा काळ हा चांगला असेल अशी आशा मला देतात… सगळ्या सुंदर आणि सामर्थ्यवान आईंना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…विश्वास ठेवा”, अशा आशयाचे कॅप्शन करीनाने दिले आहे.

आणखी वाचा : ”करीनासोबत लिव्हइनमध्ये राहायचंय”, सैफने बबीता कपूर यांना विचारताच त्या म्हणाल्या…

करीनाने सगळ्यात आधी ८ मार्च ‘जागतिक महिला दिनी’ तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिने बाळाला हातात पकडले होते, परंतु त्याचा चेहरा दिसत नव्हता. दरम्यान करीनाने फेब्रुवारीत तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:13 pm

Web Title: kareena kapoor shares taimur s pic with baby brother on mother s day says keep the faith dcp 98
Next Stories
1 “श्वेता मुलाला एकटं टाकून आफ्रिकेला गेली”, अभिनवच्या आरोपांवर श्वेता तिवारी संतापली
2 अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्याने अभिषेक चाहत्याला म्हणाला, “कुणीही त्यांच्यापेक्षा..”
3 “आईमुळे ‘ही’ गोष्ट शिकले”, ‘असं’ आहे आई आणि माऊचं नातं
Just Now!
X