पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अम्फन महाचक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अम्फन वादळामुळे पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठं नुकसान झालं आहे. येथे जवळपास ७२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अभिनेत्री करीना कपूर खानने एक पोस्ट शेअर करत या घटनेकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, असं म्हटलं आहे.

करीनाने इन्स्टाग्रामवर पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अम्फान वादळामुळे तेथील जनजीवन कसं विस्कळीत झालं आहे हे दिसून येत आहे. रस्त्यावर प्रचंड पाणी साचलं असून अनेक जण डोक्यावर सामान वाहून नेत आहेत. तर काही ठिकाणी झाडं कोसळली आहेत, अनेक माणसं आणि प्राणी जखमी झाले आहेत. हे फोटो शेअर करत ‘आपल्याला या सगळ्याचा विचार केला पाहिजे’, असं कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

We all need to think. #Repost @freddy_birdy … . #prayforbengal #helpbengal #cycloneamphan #give #nomediacoverage

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

दरम्यान, देशावर करोनाचं सावट असतानाच पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळाचं नवीन संकंट उभं राहिलं आहे. हे चक्रीवादळ करोनापेक्षाही जास्त घातक असल्याचं काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.