25 February 2021

News Flash

फार स्वस्त शाळेत शिकतोय पतौडी कुटुंबाचा छोटा नवाब

या शाळेत फक्त एक दिवस शिकवले जाते. बाकीच्यावेळी मुलं फक्त खेळायला येतात

पतौडी कुटुंबाचा छोटा नवाब दररोज त्याच्या नवनवीन लूकनी साऱ्यांची मनं जिंकत आहे. दररोज त्याचा एकतरी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. नुकताच करिनाचा तैमुरला शाळेत घेऊन जातानाचा फोटो व्हायरल झाला होता. तैमुर- करिनाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये करिना त्याला जबरदस्ती शाळेत घेऊन जाताना दिसते. तैमुर आता १५ महिन्यांचा आहे आणि करिनाने त्याचा प्रवेश प्ले- स्कूलमध्ये केला आहे.

बॉलिवूड लाइफ डॉट कॉमने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तैमुर ज्या प्ले- स्कुलमध्ये जातो तिथे अधिकतर सेलिब्रेटींची मुलं शिकायला येतात. या प्ले- स्कुलची फी समोर आली आहे. असे म्हटले जाते की, या प्ले- स्कूलची प्रत्येक महिन्याची फी किमान ५ हजार रुपये आहे. ६ महिन्यानंतर या प्ले- स्कूलची फी २२ हजार रुपये होते. या महिन्याच्या फीशिवाय पालकांना वर्षाचे ४७ हजार रुपये वेगळे द्यावे लागतात. असे म्हटले जाते की, इथले मॅनेजमेन्ट प्रत्येक आठवड्याला शाळेच्या कार्यक्रमात बदल होत असतो.

या शाळेत फक्त एक दिवस शिकवले जाते. बाकीच्यावेळी मुलं फक्त खेळायला येतात. मॅनेजमेन्टच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे इथे शिकणारी मुलं कमी वेळेत खूप काही शिकतात. या शाळेत मुलांचा प्रवेश १४ महिन्यांपासून ते २२ महिन्यांपर्यंत होतो. या शाळेत मुलं खेळांसोबतच गाणं गाणे, डान्स करणे, पपेट शो, स्पेशन राइड यासारख्या विविध उपक्रमात सहभागी होत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 4:13 pm

Web Title: kareena kapoor son taimur fees will shock you
Next Stories
1 नऊ वर्षानंतर ‘ही’ जोडी पडद्यावर एकत्र झळकणार
2 एकीकडे अरबाजची कबुली तर दुसरीकडे मुन्नी होतेय बदनाम
3 ही आहेत ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपट पाहण्यामागची पाच कारणं
Just Now!
X