News Flash

Photo : लहानग्या तैमुरचा टॅटू पाहिलात का ?

त्याचा हा टॅटू चाहत्यांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू झालं आहे

तैमुर अली खान

अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा लाडका लेक तैमुर कलाविश्वामध्ये लोकप्रिय स्टारकिड म्हणून ओळखला जातो. लोकप्रियतेमध्ये तैमुरने अनेक मोठ्या कलाकारांवर मात केली आहे. आज त्याचे असंख्ये चाहते आहेत. त्यामुळेच त्याची कोणताही माहिती समोर आल्यानंतर ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते. त्यातच आता तैमुरने टॅटू काढला असून त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या मुलाचा अबरामचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी शाहरुखने मोठ्या बर्थ डे पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला तैमुरनेदेखील हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये तैमुरने टेम्पररी टॅटू काढला होता. त्याचा हा टॅटू चाहत्यांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू झालं असून सध्या त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. अबरामने नुकताच त्याचा सहावा वाढदिवस ताज लॅड्स एण्डमध्ये सेलिब्रेट केला असून या पार्टीमध्ये एव्हेंजर्स थीम ठेवण्यात आली होती.

तैमुर लोकप्रिय स्टारकिड असल्यामुळे अनेक वेळा त्याची सोशल मीडियावर चर्चा असते. काही दिवसांपूर्वीच तैमुरच्या डाएट प्लॅनमुळे त्याची चर्चा सुरु झाली होती. फिटनेस फ्रिक असलेल्या करिनाने तैमुरसाठीदेखील नवा डाएट प्लॅन तयार केला असून तैमुरदेखील हा प्लॅन आनंदाने फॉलो करतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 3:41 pm

Web Title: kareena kapoor taimur ali khan tattoo shah rukh khan abram khan birthday bash
Next Stories
1 हृतिकने घेतली अ‍ॅक्शन स्टार ‘जॅकी चॅन’ यांची भेट
2 ..म्हणून ‘आशिकी’च्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे झाकले, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
3 Bigg Boss Marathi 2 : महेश मांजरेकर यांच्यासोबत रंगणार WEEKEND चा डाव
Just Now!
X