News Flash

“आधी तुझ्या भावाला सांग”; ‘त्या’ पोस्टनंतर करीना कपूर झाली ट्रोल

"तुम्ही पार्टी करता आणि दोष आम्हाला देता"

(छाया सौजन्य- संग्रहित)

देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातारवण निर्माण झालंय. अशात अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यामातून मदतीचा हात पुढे करत आहेत, काही सेलिब्रिटी मनोबल वाढवण्याचं काम करत आहेत तर काहीजण नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याच आवाहनं करत आहेत. अभिनेत्री करीना कपूरने नकतीच एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने नियम तोडणाऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. मात्र या पोस्टमुळे आता करीनाच ट्रोल झाली आहे.

करीना कपूरने एक पोस्ट शेअर करत मास्क न वापरणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. तसंच कोव्हिडच्या नियमांच पालन करणं गरजेचं असल्याचं म्हंटलं होतं. मात्र या पोस्टवरून नेटकऱ्यांनी करीनालाच ट्रोल केलंय. हे सगळं तुझ्या मालदीवला फिरायला गेलेल्या मित्र-मैत्रीणींना आणि चुलत भावाला सांग असं म्हणत नेटकऱ्यांनी करीनावर निशाणा साधला आहे.

करीना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली होती, “मला अजूनही कळत नाही लोक इतके निष्काळजीपणे कसे वागू शकतात. सध्या आपल्या देशात काय परिस्थिती आहे याची त्यांना कल्पना असूनही ते असे कसे वागू शकतात. तुम्ही घराबाहेर पडाताना योग्य पद्धतीने मास्क लावणे गरजेचे आहे. परंतु अनेक जण चुकीच्या पद्धतीने ते लावला आणि करानो नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा पद्धतीने वागणाऱ्यांनी एकदा दिवसरात्र करोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांबाबत विचार करायला हवा’ असे करीना म्हणाली.

यावर एक नेटकरी करीनाला म्हणाला,” सोशल मीडियावर पोस्ट करणं सोपं आहे. तु तुझ्या प्रियजनांना विचारलं का आधी जे देश संकटात असताना मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेले होते. उपदेश देण्याआधी जरा आभ्यास करत जा.” तर दुसरा युजर म्हणाला आहे. ” अरे देवा .. हिचा तर चुलत भाऊच मालदीवला गेला होता. जे संसर्ग पसरवतात आणि कायम आम्हाला दोष देतात. त्यांच्यासाठी बाहेर पडणं सोपं आहे. ते करण जोहरकडे पार्टी करतात आणि दोष मात्र आम्हाला देतात.” आणखई एक युजर म्हणालाय, ” आधी तुझ्या भावाल रणबीरला सांग”

वाचा: पगार 25 हजार आणि फॉर्च्युनरचा हफ्ता 30 हजार, आस्ताद काळेचा नगरसेवकांना टोला

(photo-instagram@kareenakapoorkhan)

 

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत लॉकडाउन लागल्याने अनेक सेलिब्रिटींनी मालदीवमध्ये धाव घेतली होती. मालदीवमधील फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत होते. देश करोनाशी लढत असताना सेलिब्रिटींच्या मालजीव ट्रीपवर देशातील अनेक नागरिकांसह काही सेलिब्रिटींनी देखईल निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 10:29 am

Web Title: kareena kapoor troll after she share post who breaks covid protocol user said tell your brother first kpw 89
Next Stories
1 पगार 25 हजार आणि फॉर्च्युनरचा हफ्ता 30 हजार, आस्ताद काळेचा नगरसेवकांना टोला
2 नाटककार शेखर ताम्हाणे यांचे निधन
3 “गेल्या २४ तासात भाजपाकडून मला आणि परिवाराला ५००च्यावर बलात्कार आणि खुनाच्या धमक्या आल्या”- सिद्धार्थ
Just Now!
X