News Flash

दीपिकावर करिना कपूर नाराज..

दोन अभिनेत्रींमधले 'कोल्ड वॉर' पाहायला मिळण्याची शक्यता

करिना कपूरच्या गरोदरपणाच्या बातमीला बरीच लोकप्रियता आणि चर्चात्मक विषयांची जोड मिळत असली तरीही अवाजवी चर्चांची हवा करिनाच्या पसंतीस उतरलेली नाही. बॉलीवुडची सध्याची सर्वात आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या एका विधानाला करिनाने जास्तच गंभीर मानत ते विधान स्वत:साठी असल्याचे समजत नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी सध्यातरी लग्न करणार नाही आहे आणि मी गरोदरही नाही आहे’ असं विधान करत दीपिकाने तिच्या आणि रणवीरच्या नात्याबाबत सुरु असणाऱ्या वायफळ चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण बी टाउनच्या ‘बेबो’ने मात्र हे विधान तिच्याच गरोदरपणाला अनुसरुन केले गेले आहे असा समज करुन घेतल्यामुळे बॉलीवुडमध्ये या दोन अभिनेत्रींमधले ‘कोल्ड वॉर’ पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘माझं गरोदर असणं हे जणू काही लग्न आणि कुटुंब विस्ताराचा करियरशी काहीच संबंध नसल्याचा संदेशच बनला आहे’, असेही ती म्हणाली. करिनाने माध्यमांवर भडकण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी एका चित्रपटाच्या निमित्ताने झिरो साइज फिगरमुळे चर्चेत आलेल्या करिनाने त्यावेळीही तिच्याविषयी उधाण आलेल्या चर्चांविषयी माध्यमांना खडसावले होते. आताही करिनाने तिच्या गरोदरपणाविषयी ‘मी गरोदर आहे, मरण पावलेले नाही. आणि प्रसूती ब्रेक (मॅटर्निटी लिव्ह) काय असतो? बाळाला जन्म देण्याची ही साधी सरळ गोष्ट आहे. प्रसारमाध्यमांनी मला अशी वेगळी वागणूक देणं आता बंद करावे. ज्यांना या गोष्टीने फरक पडतो त्यांनी माझ्यासोबत काम करू नये. माझे काम जसे आहे तसेच राहिल. एखाद्या राष्ट्रीय दुर्घटनेप्रमाणे या गोष्टीची चर्चा करणे बंद करा’, असे करिनाने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटले आहे. दीपिकाच्या या विधानावर आता पुढे काय घडणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहीले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 3:44 pm

Web Title: kareena kapoor upset with deepika padukone
Next Stories
1 कबीरने शेअर केला सलमानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या लोकेशनचा फोटो
2 सिनेमा विशेष : रजनीकांतचे हिंदीचे प्रगती पुस्तक
3 ‘दिल्ली मला लाहोरची आठवण करून देते’
Just Now!
X