News Flash

करीनाला करायचाय तिच्यापेक्षा लहान तरुणासोबत रोमान्स

तिला कमी वयाच्या तरुणासोबत रोमान्स करायचा आहे.

करीना कपूर बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती नेहमीच आपल्या चित्रपटांमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसते. आता तिला तिच्यापेक्षा कमी वयाच्या तरुणासोबत चित्रपटामध्ये रोमान्स करायचा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलिवूडचे सर्व निकष मोडणारी व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केली.

माधुरीने विकला मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला

काय म्हणाली करीना?

“अभिनेत्रीचे वय वाढले की बॉलिवूडमध्ये तिला हिरोच्या आईच्या भूमिकेत यावे लागते. परंतु मला अशा पारंपारिक भूमिकांमध्ये रस नाही. जेव्हा मी वयस्कर होईन तेव्हा माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत मला रोमान्स करायचा आहे. वयाने मोठी असलेली एक स्त्री तिच्यापेक्षा लहान मुलासोबत रोमान्स करते आणि पारंपारिक विचाराच्या समाजाला आव्हान देते. अशा प्रकारची भूमिका मला मोठ्या पडद्यावर साकारायची आहे.” असे करीना या मुलाखतीत म्हणाली.

सयाची शिंदेंचा प्रेरणादाई प्रयोग, उजाड माळरानावर फुलवलं नंदनवन

यापूर्वी अशी भूमिका कुठल्या अभिनेत्रीने साकारली?

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नशा’ या चित्रपटात अशाच प्रकारचे कथानक दाखवण्यात आले होते. या चित्रपटात अभिनेत्री पूनम पांडे तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडते. परंतु त्यावेळी ही संकल्पना भारतीय प्रेक्षकांना मात्र फारशी आवडली नव्हती. परिणामी हा चित्रपट तिकीट बारीवर जोरदार आपटला होता. या चित्रपटामुळे पुनम पांडेची सिनेकारकीर्दही संपुष्टात आली असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर जर करीना कपूरने भविष्यकाळात अशा जॉनरच्या एखाद्या चित्रपटात काम केले तर तो चित्रपट काय कमाल करतो हे नक्कीच पाहाण्याजोगे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 7:08 pm

Web Title: kareena kapoor wants to romance with a younger man mppg 94
Next Stories
1 माधुरीने विकला मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला
2 Photo : ‘मेकअप’मधील रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?
3 सयाजी शिंदेंचा प्रेरणादायी प्रयोग, उजाड माळरानावर फुलवलं नंदनवन
Just Now!
X