News Flash

‘की अ‍ॅण्ड का’ मधील गाण्यासाठी करिनाचा ३२ किलोचा लेहंगा

रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने हा लेहंगा डिझाईन केला आहे.

अभिनेत्री करिना कपूरने बॉलीवूडच्या आगामी ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटातील एका गाण्यात तब्बल ३२ किलोचा लेहंगा परिधान करून चित्रीकरण केल्याचे समजत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने हा लेहंगा डिझाईन केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण चित्रपटात करिना कपूर वेस्टर्न लूकमध्ये दिसणार आहे. मात्र, करिनाच्या भारतीय लूकचे चाहते असणाऱ्या चाहत्यांचा हिरमोड होऊ नये यासाठी ‘की अ‍ॅण्ड का’ मधील या गाण्यात करिनाचा लूक संपूर्णपणे भारतीय ठेवण्यात आला आहे. करिनाचा खास मित्र असलेल्या मनिष मल्होत्राने या गाण्यासाठी तयार केलेला ३२ किलो वजनाचा लेहंगा या गाण्याचे आकर्षण ठरणार आहे. या लेहंग्यावर खास चांदीसोन्याच्या तारा वापरून करण्यात येणाऱ्या झरदोसी पद्धतीचे नक्षीकाम करण्यात आले आहे. मुंबईतील एका स्टुडिओत या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे अंगाची लाही करणाऱ्या सध्याच्या वातावरणात इतक्या वजनाचा लेहंगा परिधान करून करिनाने तब्बल दोन दिवस न कंटाळता चित्रीकरण केले. आर.बाल्की दिग्दर्शित ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया भादुरी-बच्चन हे दोघेही दीर्घ कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 3:58 pm

Web Title: kareena kapoor wears 32 kg lehenga for ki and ka song
टॅग : Bollywood,Entertainment
Next Stories
1 …ही तर ‘पुरस्कारवापसी गँग’, अनुपम खेर यांची सडकून टीका
2 ‘मला सलमान खानसारखा प्रियकर हवा होता’
3 ‘लंडनच्या आजीबाई’ रंगभूमीवर!
Just Now!
X