News Flash

करिना कपूरला साकारायची श्रीदेवीची ही भूमिका

एका शो दरम्यान करिनाने ही इच्छा व्यक्त केली आहे

नायकप्रधान हिंदी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच सुपरस्टार पदाच्या सिंहासनावर विराजमान होणारी नायिका म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी. श्रीदेवीने तिच्या संपूर्ण करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधून अनेकांची मने जिंकली होती. बॉलिवूडमधील अभिनेत्री करिना कपूर खानदेखील श्रीदेवीची लहानपणापासून चाहती आहे. नुकताच एका शोदरम्यान करिनाने तिला श्रीदेवीची कोणती भूमिका साकारायला आवडे याचा खुलासा केला आहे.

टीव्हीवरील ‘डांस इंडिया डान्स’ या रियालिटी शोमध्ये करिनाने तिला ‘चालबाज’ चित्रपटातील श्रीदेवी यांची दुहेरी भूमिका साकारायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान करिनाने हा चित्रपट ३५ वेळा पाहिला असल्याचा खुलासादेखील केला आहे. ‘मला पहिल्यापासून सीता और गीता किंवा चालबाज या सारख्या दोहेरी भूमिका असलेल्या चित्रपटांमध्ये काम करायचे होते. मला आत्ता पर्यंत दुहेरी भूमिका असलेल्या चित्रपटाची ऑफर आलेली नाही. माझी दुहेरी भूमिका साकारण्याची मनापासून इच्छा आहे’ असे करिना म्हणाली.

सध्या करिना तिचा आगमी चित्रपट ‘गूड न्यूज’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात करिनासह बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अभिनेत्री कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त करिना इरफान खानच्या ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच तिला करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटासाठी देखील ऑफर आली असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:04 pm

Web Title: kareena kapoor wish to play chalbaj movie role of shridevi avb 95
Next Stories
1 …म्हणून ‘झीरो’नंतर अनुष्काने घेतला चित्रपटातून ब्रेक!
2 Photo : जबरा फॅन! चाहत्याने गाडीवर लिहिलं शिवानीचं नाव
3 ‘तुला पाहते रे’नंतर कोणती मालिका? सुबोध म्हणतो…
Just Now!
X