News Flash

करीना कपूरची वार्षिक कमाई किती.. फक्त सात लाख!

बनावट विवरणपत्र सादर; तक्रार दाखल

करीना कपूर

बनावट विवरणपत्र सादर; तक्रार दाखल

मोठय़ा पडद्यावरील अनेक चित्रपटांप्रमाणेच छोटय़ा पडद्यावरील उत्पादनांच्या असंख्य जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या, पतौडी येथील नवाबांची सून असलेल्या आणि चित्रपटसृष्टीमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या कपूर घराण्याचा वारसा सांगणाऱ्या करीना कपूर हिची वार्षिक कमाई किती असेल? सहा कोटी, सात कोटी, दहा कोटी? पण आयकर विभागाकडे सादर झालेल्या तिच्या विवरणपत्रानुसार करीनाची गेल्या आर्थिक वर्षांतील एकूण मिळकत फक्त सात लाख रुपये आहे. हे विवरणपत्र पाहून खुद्द करीनालाही आश्चर्याचा धक्का बसला आणि तिने थेट सायबर क्राइम पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. करीना कपूरच्या पॅनकार्डचा तपशील वापरून तिचे बनावट विवरणपत्र सादर करण्यात आल्याच्या गुन्ह्य़ाचा तपास आता पोलीस करत आहेत.

आयकर विभागाने विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी अभिनेत्री करीना कपूर तिच्या सनदी लेखापालांकडे विवरणपत्राचे तपशील देण्यासाठी गेली होती. आयकर विभागाच्या संकेतस्थळावरून विवरणपत्र भरण्यास सुरुवात करताना पॅनकार्ड क्रमांक मागितला जातो. करीनाचा पॅनकार्ड क्रमांक टाकल्यानंतर त्या पॅनकार्डसाठीचे विवरणपत्र याआधीच सादर झाल्याचे संकेतस्थळाने दाखवून दिले. पुढे तपास केला असता करीना कपूरच्या नावाने गेल्या आर्थिक वर्षांत केवळ सात लाख रुपयांची मिळकत असल्याचे निदर्शनास आले.

कोण्या अज्ञात व्यक्तीने ऑगस्ट महिन्यात करीनाचा पॅनकार्ड क्रमांक, तिचा संकेत क्रमांक आणि डिजिटल स्वाक्षरी यांचा वापर करून हे विवरणपत्र आयकर विभागाच्या संकेतस्थळावर सादर केले होते. हे लक्षात येताच करीनाचे सनदी लेखापाल प्रकाश ठक्कर यांनी तातडीने वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर क्राइम पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. सायबर क्राइम पोलिसांनीही याबाबत तातडीने गुन्हा नोंदवत तपास चालू केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 2:19 am

Web Title: kareena kapoor yearly income 7 lakh
Next Stories
1 ‘ब्रेकअप’मधून सावरण्यासाठी कतरिनाने काढला ‘हा’ तोडगा
2 नाना पाटेकर यांच्या पत्नीचे छोट्या पडद्यावर पदार्पण
3 सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानात ‘पिंक’वर बंदी
Just Now!
X