20 October 2020

News Flash

करिनाच्या ‘या’ बॅगची किंमत ऐकाल तर व्हाल थक्क!

या बॅगवर एक खास डायमंड बसविण्यात आला आहे

बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर सध्या लंडनमध्ये फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र या काळात सुद्धा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती आणि करिश्मा कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून येथील काही फोटो शेअर करत आहेत. या फोटोंपैकी करिनाचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा फोटो व्हायरल होण्यामागे तिची बॅग कारण ठरत आहे.

करिनाने काही दिवसापूर्वी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये करिनाने डेनिमची जीन्स आणि ब्लॅक कलरचा जॅकेट परिधान केलं होतं. सोबतच एक स्लिंग बॅकही कॅरी केली होती. करिनाच्या याच लूकची सध्या चर्चा रंगली असून तिची स्लिंग बॅक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. करिनाची ही बॅग एका लोकप्रिय कंपनीची आहे. त्यासोबतच ती प्रचंड महाग आहे.

 

View this post on Instagram

 

#blackisalwaysagoodidea

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करिनाची ही बॅग तब्बल साडेतीन लाख रुपये किंमतीची आहे. या बॅगवर एक खास डायमंड बसविण्यात आला आहे. शॅनलची असलेली ही बॅग दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. यातील लहान बॅगची किंमत दीड लाख रुपये आहे, तर मोठ्या बॅगची किंमत साडेतीन लाख रुपये आहे.

दरम्यान, करिना कायमच तिच्या फॅशनसेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. पुरस्कार सोहळा असो किंवा व्हेकेशन प्रत्येक ठिकाणी करिना आपल्या फॅशनकडे लक्ष देत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 12:38 pm

Web Title: kareena kapoors chanel sling bag worth rs 3 6 lakh will burn a hole in your pocket ssj 93
Next Stories
1 Video: सलमान गुणगुणतोय किशोर कुमारांचे गाणे
2 ‘सेक्रेड गेम्स २’ व ‘गली बॉय’चं कनेक्शन माहीत आहे का?
3 Throwback: ओळखा पाहू बॉलिवूडमधील ‘हा’ अभिनेता कोण?
Just Now!
X