News Flash

होळीच्या रंगात रंगला तैमूर, बहिणीसोबत होळी खेळतानाचे फोटो व्हायरल

सध्या इनाया आणि तैमूरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पण यंदा करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वजण घरातच कुटुंबीयांसोबत होळी साजरी करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री करीना कपूर खानने मुलगा तैमूरचा होळी खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमूर आणि सोहा अली खानची मुलगी इनाया घरातच होळी खेळत असतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तैमूरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे आणि तो फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. तैमूरचा हा फोटो शेअर करत करीनाने ‘सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा… सर्वांनी काळजी घ्या, निरोगी रहा’ असे म्हटले आहे.


करीनाने पोस्ट केलेल्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मलायका अरोराने ‘क्यूट’ म्हटले आहे. अमृता अरोराने देखील क्यूट असे म्हटले आहे. चाहत्यांनी तैमूरच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

लंडनमध्येही होळी जोरात! ‘देसी गर्ल’ने पती आणि सासू-सासऱ्यांसोबत साजरी केली होळी

सोहा अली खानने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला तैमूर आणि इनायाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही घरात पूलमध्ये बसले असून होळी खेळताना दिसत आहेत. दरम्यान इनायाने राखाडी रंगाचा टॉप परिधान केला आहे. ते दोघे एकमेंकांना रंग लावताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 2:56 pm

Web Title: kareena kapoors son taimur soha ali khans daughter inaaya enjoy a pool party avb 95
Next Stories
1 ‘वाथी कमिंग’वर शशांकचा भन्नाट डान्स, पत्नी प्रियांका म्हणाली डान्स शिकण्याची गरज
2 मुस्लिम असल्यामुळे भरतनाट्यम शिकवण्यास गुरुजींनी दिला होता नकार, वहीदा रहमान यांचा खुलासा
3 खऱ्या पुरुषाने काय करायला हवं?; सनी लिओनी म्हणाली…
Just Now!
X