News Flash

सैफच्या ‘इंटिमेट’ दृश्यांमुळे मला चिंता वाटत नाही – करिना

अभिनेता सैफ अली खान याने इतर अभिनेत्रींबरोबर चित्रपटात इंटिमेट दृश्य़े दिल्यास मला कसलाही त्रास होत नाही किंवा त्याची काळजीही वाटत नाही... ही प्रतिक्रिया आहे अभिनेत्री

| November 6, 2013 01:00 am

अभिनेता सैफ अली खान याने इतर अभिनेत्रींबरोबर चित्रपटात इंटिमेट दृश्य़े दिल्यास मला कसलाही त्रास होत नाही किंवा त्याची काळजीही वाटत नाही… ही प्रतिक्रिया आहे अभिनेत्री आणि सैफची पत्नी करिना कपूर हिची. 
करिना म्हणते, तशा दृश्य़ांमुळे मला अजिबात काळजी वाटत नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हे दोन्ही वेगळे असून, व्यावसायिक आयुष्यातील घटनांचा वैयक्तिक आयुष्यावर मी परिणाम होऊन देत नाही. त्यामुळेच चित्रपटातील इंटिमेट दृश्यांमुळे मला काळजी वाटत नाही. तो एक अभिनेता आहे आणि ते त्याचे काम आहे, असेच मी समजते.
सैफला चित्रपटामध्ये इतर अभिनेत्रींसोबत इंटिमेट दृश्ये द्यावी लागतात. जर चित्रपटात एखादे रोमॅंटिक गाणे असेल, तर त्याल रोमॅंटिक हिरोसारखे दिसावेच लागेल. सोबतच्या अभिनेत्रींसोबत त्याने कायम सुंदर दिसावे, अशीच माझी अपेक्षा आहे, असेही करिना म्हणाली. ‘बुलेट राजा’मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि सैफची जोडी उत्कृष्ट वाटल्याचेही तिने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 1:00 am

Web Title: kareena not worried about husbands intimate scenes on screen
Next Stories
1 बॉलीवूड बंगाली सौंदर्यवतींचा पश्चिम बंगाल सरकारकडून सत्कार
2 रणबीर-कतरिनाची खुल्लमखुल्ला एकत्र दिवाळी
3 पाहाः करिना, इमरानचे ‘दिल डफर’ गाणे
Just Now!
X