अभिनेत्री करिना कपूरने नुकताच तिचा वाढदिवस एका धम्माल पार्टीमध्ये साजरा केला. काही कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत करिनाने तिचा वाढदिवस साजरा केला. सध्या करिना गरोदर असल्यामुळे तिच्यावरच अनेकांचे लक्ष आहे. करिनाची काळजी घेण्यासाठी बी टाऊमनधील अनेक कलाकार आणि तिचे कुटुंबिय पावलोपावली पुढे सरसावत आहेत. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने ‘बेगम’ करिना गरोदर असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर जाहिर केले होते. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

वाचा: करिनाला ‘कारल्या’चे डोहाळे!
‘बेबो’च्या होणाऱ्या बाळाबाबत अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली असताना तिने एका कार्यक्रमात होणाऱ्या बाळाचे नाव काय असेल याबाबतस खुलासा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कार्यक्रमादरम्यान करिनाने तिच्या गरोदरपणाची माहिती सैफला मिळताच त्याची काय प्रतिक्रीया होती? या प्रश्नाचे उत्तर देताना, त्यांच्या होणाऱ्या बाळाचे नाव काय असेल यावरुन हलकासा पडदा उचलला. करिना आणि सैफ हे जोडपे बी टाऊनमध्ये ‘सैफिना’ या नावानेही ओळखले जाते. सैफला ‘सैफिना’ या नावाची फारच गंमत वाटते आणि म्हणूनच आपण आपल्या बाळाचे नाव ‘सैफिना’ ठेवू असे तो गंमतीने म्हणाल्याचे करिनाने सांगितले.

वाचा: गरोदर स्त्रिया चालतात, मी तर उडू शकते – करिना कपूर
करिना आणि सुप्रसिद्धी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राचा सहभाग असणारा हा कार्यक्रम लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण, सध्यातरी करिनाने केलेल्या या विधानामुळे तिच्या होणाऱ्या बाळाचे नाव नक्की काय असणार आहे, याबाबतच्या चर्चा रंगत आहेत.