News Flash

“राजा हिंदुस्तानीमधील किसिंग सीन देताना मी थरथरत होते”,करिश्माने केला होता खुलासा

आज २५ जून करिश्माचा वाढदिवस आहे. करिश्मा आज ४७ वर्षांची झाली आहे.

आज २५ जून करिश्माचा वाढदिवस आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. अत्यंत देखणी, हुशार आणि त्यात कपूर कुटुंबातून आलेली अभिनेत्री असल्याने तिच्या नावाची चांगलीच चर्चा असायची. आज २५ जून करिश्मा कपूरचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आपण काही गोष्टी जाणून घेऊन येऊया.

करिश्माचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. पण तिच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी’. हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात करिश्मासोबत बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. चित्रपटातील गाणी तर आजही लोक गुणगुणत असतात. त्यातील ‘परदेसी जाना नाही’ हे गाणं आजही अनेक ठिकाणी वाजताना ऐकायला मिळतं.

आणखी वाचा : ‘दोन मुलांची आई असल्याने मला काम मिळतं नाही..’, अभिनेत्रीने केला खुलासा

एका मुलाखतीत करिश्माने चित्रपटाशी संबंधित एक खुलासा केला आहे. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा एका सीनची प्रचंड चर्चा सुरु होती. तो सीन होता आमिर खान आणि करिश्माचा किसिंग सीन. या सीनसंबंधी करिश्माने खुलासा केला असून त्यावेळी ती प्रचंड घाबरली होती असं तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

पुढे हा सीन देताना ती थरथरत असल्याचे सांगत करिश्मा म्हणाली, “राजा हिंदुस्तानी चित्रपटाबद्दल अनेक आठवणी आहेत. पण जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा लोकांमध्ये किसिंग सीनसंबंधी चांगलीच चर्चा होती. पण त्यांना माहिती नाही की, हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले होते. फेब्रुवारी महिन्यात उटीमध्ये खूप थंडी होती. आणि हा सीन संध्याकाळी सहा वाजता शूट केला जात होता. त्यामुळे मी अक्षरश: थरथरत होते. हा सीन कधी संपणार असा विचार मी सतत करत होते.”

आणखी वाचा : लग्झरी गाड्या ते सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता; जाणून घ्या थलपथी विजयच्या संपत्ती बद्दल

करिश्मा सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. करिश्माचे लाखो चाहते आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 10:52 am

Web Title: karishma kapoor on raja hindustani kissing scene dcp 98
Next Stories
1 द फॅमिली मॅन 2 : ‘समांथाने दिलेले ते इंटिमेट सीन्स नंतर डिलीट करण्यात आले’
2 भरदिवसा अभिनेत्याच्या कारमधून झाली चोरी
3 करिश्माला पतीने केला होता विकण्याचा प्रयत्न
Just Now!
X