News Flash

‘या’ कारणामुळे करिश्मा कपूरने ‘दिल तो पागल है’ सिनेमासाठी दिला होता नकार

'दिल तो पागल है' या सिनेमातील गाणी आणि करिश्मा कपूरच्या डान्सला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती.

(Photo-instagram@therealkarismakapoor)

अभिनेत्री करिश्मा कपूरने सध्या अभिनयाकडे पाठ फिरवली असली तरी एकेकाळी करिश्माने तिच्या अभिनयाच्या आणि डान्सच्या जादूने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. आजही करिश्माचे लाखो चाहते आहेत. करिश्माच्या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘दिल तो पागल है’ सिनेमा. या सिनेमासोबतच सिनेमातील गाणी आणि करिश्मा कपूरच्या डान्सला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. मात्र नुकताच करिश्माने या सिनेमाबाद्दल एक खास किस्सा सांगितला आहे. सुरुवातीला करिश्माने या सिनेमाला नकार दिला होता या गोष्टीचा तिने खुलासा केलाय.

सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘इंडियन आयडल’ शोला सध्या फिनालेचे वेध लागले आहेत. या शोमध्ये वेळोवेळे वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवत असतात. यंदाच्या आठवड्यात अभिनेत्री करिश्मा कपूरने या भागात खास हजेरी लावली. या शोमध्ये करिश्मामने तिने सुरुवातीला ‘दिल तो पागल है’ सिनेमा करण्यास नकार दिला होता या गोष्टीता खुलासा केला. या शोमध्ये करिश्मा म्हणाली, ” मला दिल तो पागल है सिनेमाची ऑफर आली तेव्हा मला वाटलं हा एक डान्स सिनेमा आहे आणि त्यात माधुरीसोबत काम करायच? मीच नाही अनेक इतर कलाकारांनीदेखील माधुरीसोबत कसं डान्स करणार हे कारण देत सिनेमाची ऑफर नाकारली होती. त्यामुळे मी देखील नकार दिला.”

हे देखील वाचा: ‘RRR’ सिनेमाच्या मेकिंगचा दमदार व्हिडीओ, ‘बाहुबली’ला देणार टक्कर!

पुढे करिश्मा म्हणाली, “त्यानंतर यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी शेवटपर्यंत मला सिनेमाची कथा ऐकवली. तेव्हा माझ्या आईने मला हे आव्हान स्विकारायला हंव असं सुचवलं. आई म्हणाली जर तू माधुरीचं नेहमी कौतुक करते तर तुला हा सिनेमा करायला हवा. तू खूप मेहनत घे नक्कीच यश मिळेल.” आईच्या समजावण्यानंतर करिश्माने सिनेमाची ऑफर स्विकारली.

‘इंडियन आयडल’च्या मंचावर करिश्माने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘दिल तो पागल है’ सिनेमा तिच्यासाठी खास असून या सिनेमावेळी शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितने तिला पुढे जाण्यासाठी पाठिंबा दिल्याचं करिश्मा म्हणाली.

या खास भागात अनेक स्पर्धकांनी करिश्माची लोकप्रिय ठरलेली गाणी सादर केली. यात , ‘यारा ओ यारा, मिलना हमारा’ तसचं ‘फूलों सा चेहरा तेरा’ ही गाणी करिश्माने देखील एन्जॉय केली. तसचं मंचावर येत करिश्माने तिच्या काही गाण्यावर स्पर्धकांसोबत ठेका धरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 2:42 pm

Web Title: karishma kapoor revealed why she rejected offer dil to pagal hai movie first in indian idol kpw 89
Next Stories
1 “माझं काही बरं वाईट झालं, तर…”; जॅकी भगनानीवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीचा आणखी एक गौप्यस्फोट
2 ‘कोण होणार करोडपती’मध्ये हॉटसीटवर बसणार नाना पाटेकर
3 ‘RRR’ सिनेमाच्या मेकिंगचा दमदार व्हिडीओ, ‘बाहुबली’ला देणार टक्कर!
Just Now!
X