अभिनेत्री करिश्मा कपूर बॉलिवूडपासून दुरावली असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टीव असते. करिश्माचे स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. तर करीनासोबतच करिश्मादेखील फिटनेसकडे लक्ष देताना दिसते.
करिश्मा कपूरने नुकताच तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.या फोटोत करिश्माचे अॅब्स दिसत आहेत. जिम केल्यानंतरचा हा फोटो करिश्माने शेअर केलाय. या फोटोला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. तर तिच्या फिटनेसचं अनेकांनी कौतुक केलंय.
View this post on Instagram
या फोटोला डिझायनर मनीष मल्होत्राने खास कमेंट दिलीय. “तू आजही दिल तो पागल है मध्ये होतीस तशीच दिसतेय” अशी कमेंट त्यानं दिलीय. काही सेलिब्रिटींनी फायरचं इमोजी देवून करिश्माच्या फोटोला पसंती दिलीय. करिश्मा कपूर 48 वर्षांची असून तिला दोन मुलं आहेत. अशातही तिने फिट राहण्याकडे पूर्ण लक्ष दिलं आहे. करिश्मा कपूर बऱ्याचदा तिचे वर्कआउट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
2020 मध्ये आलेल्या ‘मेंटसहूड’ या वेब सीरिजमध्ये करिश्मा झळकली होती. मात्र सध्या ती कुटुंबासोबत जास्त वेळ घालवताना दिसते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 1, 2021 6:44 pm