27 November 2020

News Flash

Video : करीनाच्या ‘या’ वर्तणुकीमुळे करिष्मावर आली होती ट्रोल होण्याची वेळ

करीनामुळे झाली करिष्मा कपूर ट्रोल

बॉलिवूडमधील गाजलेली बहिणींची जोडी म्हणजे करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर. अनेकदा या बहिणींची सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. कोणतीही पार्टी असो किंवा एखादा कार्यक्रम हा दोघी बहिणी कायम एकत्र दिसून येतात. अनेकदा त्या एकमेकींचे फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामध्येच या दोघींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात करीनामुळे ट्रोल होण्याची वेळ आल्याचं करिष्मा सांगताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ व्हॉट वुमन वॉन्ट्स या शोमधील आहे. या शोमध्ये करीना होस्ट असून ती कार्यक्रमात सहभागी झालेल्या करिष्माला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. यात “सोशल मीडियावर तुला कोणत्या गोष्टीमुळे सगळ्यात जास्त ट्रोल व्हावं लागलं?,” असा प्रश्न करीनाने विचारला. त्यावर करिष्माने पटकन करीनाचं नाव घेतलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Brut India (@brut.india)

“खरंच प्रामाणिकपणे सांगू? तुझ्यामुळे मी जास्त ट्रोल झाले.तुझ्या एका पाऊट केलेल्या फोटोमुळे मी ट्रोल झाले होते. मॅडम, प्लीज तुमच्या बहिणीला सांगा इतका मोठा पाऊट करु नका, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता,”असं उत्तर करिष्माने दिलं.

दरम्यान, करीना आणि करिष्मा ही कलाविश्वातील लोकप्रिय व गाजलेली जोडी आहे. अनेकदा सोशल मीडियावर या दोन्ही बहिणींचे फोटो व्हायरल होत असतात. आतापर्यंत या दोघींनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, अद्यापही दोघींनी एकमेकींसोबत काम केलेलं नाही त्यामुळे या दोघींना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 2:57 pm

Web Title: karishma kapoor trolled over kareena kapoor pout ssj 93
Next Stories
1 रणवीरच्या या जाहिरातीमुळे सुशांतचे चाहते भडकले, केली बॉयकॉट करण्याची मागणी
2 ‘जिगरबाज’मध्ये दिसणार प्रतीक्षा लोणकरांचा नवा अंदाज; साकारणार ‘ही’ भूमिका
3 Birthday Special : या प्रश्नाचे उत्तर देत सुष्मिता सेनने जिंकला होता ‘मिस युनिव्हर्स’चा किताब
Just Now!
X