News Flash

‘या’ वेबसीरिजमधून करिश्मा करणार कमबॅक

एकता कपूर या सीरिजची निर्मिती करत आहे

करिश्मा कपूर

‘झुबैदा’, ‘हिरो नंबर १’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या चित्रपटातून विविध भूमिका साकारत प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री करिश्मा कपूरचा आता कलाविश्वात म्हणावा तसा वावर राहिलेला नाही. बॉलिवूडच्या लोलोने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली आहे. करिश्मा पडद्यावर जरी झळकत नसली तरीही ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. मात्र आता करिश्मा लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. एकता कपूरच्या आगामी वेबसीरिजमध्ये करिश्मा झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

करिश्मा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डेंजरर्स इश्क’ या चित्रपटात शेवटी झळकली होती. त्यानंतर फार कमी वेळा ती मोठ्या पडद्यावर आली. करिश्मा लवकरच वेबसीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत असून या सीरिजची निर्मिती प्रसिद्ध निर्माती एकता कपूर करणार आहे.

ऑल्ट बालाजीच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारी ही सीरिज अमेरिकन टीव्ही सीरिज ‘प्रिटी लिटील लायर्स’वर आधारित असून करिश्मा यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘मेंटलहुड’ असं या सीरिजचं नाव असून यामध्ये संघर्ष करणाऱ्या पाच मातांची कथा उलगडली जाणार आहे.

दरम्यान, या सीरिजची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या सीरिजचं प्रथम ‘मेंटल’ असं नाव ठेवण्यात येणार होतं. मात्र अभिनेता सलमान खान आणि सोहेल खान यांनी या पूर्वीच या नावाच्या टायटलची नोंद केली आहे. त्यामुळे एकताने या सीरिजचं नाव बदलून ‘मेंटलहुड’ असं केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 10:01 am

Web Title: karishma kapoor web series debut
Next Stories
1 थोडी तरी लाज बाळग, हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे सौंदर्या ट्रोल
2 शहिदांसाठी ‘भारत के वीर’ने अक्षयच्या मदतीने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी
3 पुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..