31 May 2020

News Flash

गोरिलासोबत अभिनेत्रीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल..

Video: 'सजनी पर दिल आ गया'; अभिनेत्रीने केला गोरिलासोबत डान्स

‘खतरों के खिलाडी’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा रिअॅलिटी शो जिंकण्यासाठी स्पर्धकांना आपल्या भितीवर नियंत्रण मिळवावे लागते. ‘खतरों के खिलाडी’चा प्रोमो सध्या गोरिला डान्समुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक अभिनेत्री चक्क गोरिलासोबत डान्स करताना दिसत आहे.

अवश्य पाहा – १०वी पास असलेल्यांसाठी ‘इस्रो’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ४५ हजार पगार

अवश्य पाहा – अन् नेहा कक्करनं दिली दोन-दोन हजारांच्या नोटेची भीक

कुठल्या अभिनेत्रीनं केला गोरिलासोबत डान्स?

कलर्स वाहिनीच्या ट्विटर हँडलवर ‘खतरों के खिलाडी’चा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अनेक कलाकार आपल्या भितीवर नियंत्रण मिळवताना दिसत आहेत. परंतु यात खऱ्या अर्थाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने. छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री गोरीलासोबत नृत्य सादर करताना दिसत आहे. तिने ‘सजनी पर दिल आ गया’ या गाण्यावर गोरिलासोबत डान्स केला आहे. करिश्माने केलेला हा गंमतीदार डान्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – Mr India 2 मध्ये ‘मोगॅम्बो खुश हुआ’ म्हणणार ‘हा’ आघाडीचा अभिनेता

अवश्य वाचा – “बुलाती है मगर जाने का नहीं” ब्रेकअप करणाऱ्या अभिनेत्रीला बॉयफ्रेंडचे भन्नाट उत्तर

‘खतरों के खिलाडी’ हा एक रिअॅलिटी शो आहे. हा रिअॅलिटी जिंकण्यासाठी स्पर्धकांना आपल्या भितीवर नियंत्रण मिळवावे लागते. यंदाचे या शोचे १० वे पर्व आहे. यावेळी मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, अदा खान, करण पटेल, शिविन नारंग, तेजस्वी प्रकाश, कॉमेडियन बलराज स्याल, करिश्मा तन्ना, भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जी, असे अनेक प्रसिद्ध कलाकार यावेळी झळकणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारीपासून ‘खतरों के खिलाडी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 2:04 pm

Web Title: karishma tanna khatron ke khiladi 10 gorilla mppg 94
Next Stories
1 ..म्हणून बिग बींनी आठवडाभर धुतलं नव्हतं तोंड
2 Filmfare Awards 2020: ‘गली बॉय’नं पुरस्कार विकत घेतले; विकीपीडियाची उडाली झोप?
3 ‘हम आप के हैं कौन’मधील ही अभिनेत्री झळकणार वेब सीरिजमध्ये!
Just Now!
X