News Flash

तथाकथित प्रियकरासोबत करिष्माची पार्टी

व्यावसायिक संदीप तोशीवालच्या रुपात करिष्माच्या आयुष्यात नवे प्रेम

बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री करिष्मा कपूर सध्या तिच्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे बरीच चर्चेत आहे. पती संजय कपूर याने आपला मानसिक छळ केला असून त्याने आपल्याशी केवळ पैशासाठी लग्न केल्याचा आरोप करिष्माने लावला होता. त्यानंतर करिष्माने आपल्या पतीचे घर सोडले आणि ती माहेरी राहू लागली. मात्र, पती संजयला आपण घटस्फोट देणार नसल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच करिष्माने केला होता.
करिष्माची घटस्फोटाची चर्चा वगळता अजून एका वृत्तामुळे तिचे नाव चर्चेत आले आहे. आपल्या तथाकथित प्रियकरासोबत करिष्माने पार्टी केल्याची चर्चा रंगलीय. व्यावसायिक संदीप तोशीवालच्या रुपात करिष्माच्या आयुष्यात नवे प्रेम आल्याचे बोलले जातेय. टाइम्सच्या वृत्तानुसार, करिनाने दिलेल्या पार्टीत करिष्मा आणि संदीपची जवळीक पाहावयास मिळाली. यावेळी दोघांनी मिळून पार्टीचा आनंद लुटल्याचे कळते. मात्र, अद्याप या दोघांनीही आपल्या नात्याविषयी कोणतीही कबुली दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2016 10:25 am

Web Title: karisma kapoor and her rumoured boyfriend party together
Next Stories
1 वधूच्या वेशात अनुष्का!
2 ‘कटय़ार’ व ‘नटसम्राट’नंतर आता ‘ती फुलराणी’ रुपेरी पडद्यावर!
3 फवाद खान ६१ वर्षीय संगीतकाराच्या भूमिकेत
Just Now!
X