News Flash

करिश्मा कपूरने बहिण करिनासोबत शेअर केला फोटो; म्हणाली, लवकरच…

करिश्मा कपूरने नुकतंच बहिण करिना कपूरसोबतचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत करिश्मा कपूरने एक मोठी हिंट सुद्धा दिलीय.

(Photo: Punit Malhotra/Instagram)

अभिनेत्री करिश्मा कपूर ही ९० च्या दशकातली गाजलेली अभिनेत्री ठरलीय. करिश्मा कपूरने त्या काळी प्रत्येक सुपरस्टार अभिनेत्यासोबत स्कीन शेअर केली. पण गोविंदासोबतच तिची जोडी कायम हिट ठरली. करिश्मा कपूर हल्ली चित्रपटांमध्ये तर खूप कमी दिसून येतेय. पण सोशल मीडियावर तिची लोकप्रियता मात्र काही कमी झालेली नाही. करिश्मा कपूरने नुकतंच बहिण करिना कपूरसोबतचा एक फोटो शेअर केलाय. दोघा बहिणींचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. हा फोटो शेअर करत करिश्मा कपूरने एक मोठी हिंट सुद्धा दिलीय.

करिश्मा कपूरने तिची लहान बहिण करिना कपूरसोबतचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हा फोटो शेअर करत तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “बेबोसोबतचं शूटिंग नेहमीच स्पेशल असतंच…लवकरच काही तरी निराळं आणि रोमांचक घडणार आहे…” या कॅप्शनसोबत करिश्मा कपूरने तिच्या फॅन्सना एक मोठी हिंट सुद्धा दिलीय. करिश्मा कपूर लवकरच लहान बहिण करिना कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चे दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांच्या एका प्रोजेक्टमध्ये या दोघी बहिणी एकत्र काम करणार आहेत.

या दोघा बहिणींचा फोटो काही मिनीटांतच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. अवघ्या चार तासांमध्येच तिच्या या फोटोला १ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. फक्त फॅन्सच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सुद्दा या स्पेशल फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

अभिनेत्री करिश्मा कपूरने १९९१ साली ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. २०२० साली रिलीज झालेल्या ‘मेंटलहुड’ या वेब सीरिजमधून करिश्मा कपूर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर करिना कपूर २०२० मध्येच रिलीज झालेल्या ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटातून भेटीला आली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता इरफान खान सुद्धा झळकला होता. त्यानंतर ती लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ मधून अभिनेता आमिरसोबत झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 10:57 pm

Web Title: karisma kapoor shared photos with sister kareena kapoor says something exciting coming soon prp 93
Next Stories
1 आमिर खानच्या मुलीचा बॉयफ्रेंडसोबत फोटो व्हायरल; एकत्र एन्जॉय करत आहेत व्हेकेशन
2 अभिनेत्री जेनिफर विंगेट करोना पॉझिटिव्ह; सुरू करणार होती ‘कोड एम २’चं शूटिंग
3 जेव्हा राज कुंद्रा म्हणाला होता, “मला गरिबीचा तिरस्कार आहे, म्हणून मी श्रीमंत बनलो….”
Just Now!
X