04 March 2021

News Flash

‘ढिल्या कपड्यांमुळे मारली होती थोबाडीत’; करिश्माने घटस्फोटित पतीवर केला आरोप

भर कार्यक्रमात करिश्मावर उचलला होता हात; संजय कपूरवर अभिनेत्रीने केले आरोप

करिश्मा कपूर ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फिल्मी जगात प्रचंड यश मिळवणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य मात्र संघर्षमय होतं. २००३ साली तिने संजय कपूर नामक एका व्यवसायिकासोबत लग्न केलं. मात्र तिचं लग्न दिर्घ काळ टिकलं नाही. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. १३ वर्षांच्या संसारात करिश्माने दोन वेळा घटस्फोट मिळवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या वेळी ती यशस्वी ठरली. लक्षवेधी बाब म्हणजे घटस्फोट घेताना तिने आपल्या पतीवर कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप केले होते. एकदा तर एका घरगुती कार्यक्रमात तिला थोबाडीत मारण्यात आलं अशी तक्रार तिने केली होती.

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा ग्लॅमरस अवतार; अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटमुळे चाहते आवाक्

करिश्माने नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हा चकित करणारा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “त्या वेळी नुकतंच मला मुलं झालं होतं. गरोरदर असताना मी थोडे जाड झाले होते. परिणामी लठ्ठ शरीरामुळे मला टाईट कपडे घालणं शक्य नव्हतं. परंतु माझा पेहराव पाहून संजय माझ्यावर संतापायचा. एकदा तर त्याने माझ्या कपड्यांवर राग व्यक्त करत आपल्या आईला मला थोबाडीत मारण्यास सांगितलं. तिनं देखील भर कार्यक्रमात मागेपुढे न पाहता माझ्यावर हात उगारला होता.”

अवश्य पाहा – फटाक्यांच्या पॅकेट्सवर परिणीतीचे फोटो; ‘इकोफ्रेंडली दिवाळी’ म्हणणारी अभिनेत्री होतेय ट्रोल

सात वर्षांपूर्वी करिश्माचं घटस्फोट प्रकरण प्रचंड चर्चेत होतं. हे प्रकरण जवळपास वर्षभार कोर्टात सुरु होतं. घटस्फोट मागताना करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. कौटुंबीक हिंसाचाप्रकरणी त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी देखील तिने केली होती. मात्र हे आरोप संजयने फेटाळले होते. अखेर २०१३ साली करिश्माला घटस्फोट मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:09 pm

Web Title: karisma kapoor sunjay kapur divorce mppg 94
Next Stories
1 ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा
2 या व्हिडीओमुळे प्रिया वॉरियर झाली व्हायरल…
3 ‘आपण एक महान कलाकार गमावला’; सौमित्र चटर्जी यांना बॉलिवूडनं वाहिली श्रद्धांजली
Just Now!
X