News Flash

सलमानसोबत करिश्मा करणार रुपेरी पडद्यावर पुनरागमन?

दिग्दर्शक डेविड धवन सलमान-करिश्माला पुन्हा एकत्र आणणार

डेविड धवन यांच्या आगामी 'जुडवा २' चित्रपटात करिश्मा कपूर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. २०१२ मध्ये ‘डेंजर इश्क’ चित्रपटातून दर्शन देणारी करिश्मा पुन्हा एकदा चंदेरी दुनियेत येण्यास सज्ज झाली आहे. तब्बल पाच वर्षानंतर करिश्मा नव्वदीच्या दशकातील ‘जुडवा’ या चित्रपटाच्या सिक्वलमधून पुन्हा एकदा प्रेक्षेकांच्या भेटीला येण्याचे संकेत मिळत आहेत. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटात करिश्मा सलमान खानसोबत झळकली होती. त्यानंतर आता ती लवकरच ‘जुडवा २’ या आगामी चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. डेविड धवन दिग्दर्शित ‘जुडवा २’ या चित्रपटात वरुण धवन सोबत सलमान खान दिसणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. आपल्या मुलाच्या चित्रपटात काम करण्यासाठी सलमानला राजी केल्यानंतर डेविड धवन यांनी चित्रपटात सलमानच्या साथीला करिश्माला पसंती दिल्याचे समजते.  या चित्रपटात संधी मिळाल्यास काम करण्यास उत्सुक असल्याचे करिश्माने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

१९ वर्षापूर्वी ‘जुडवा’ चित्रपटातील जोडीला एकत्र आणण्यासाठी ‘जुडवा २’ या चित्रपडटासाठी दिग्दर्शक डेविड धवन यांनी करिश्माची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या चित्रपटात करिश्मा कपूरच्या भूमिकेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ‘ढिशूम’ या चित्रपटानंतर अभिनेता वरुण धवन काही काळ बॉलिवूडपासून दूर होता. वरुण धवन लवकरच अभिनेता सलमान खानच्या ‘जुडवा’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनच त्याबाबतची घोषणा केली होती. वरुणसोबत या चित्रपटामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नूसुद्धा झळकणार आहे.

१९९७ ला प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा डेविड धवन यांनीच केले होते. त्यामुळे येत्या काळात ‘जुडवा २’ या चित्रपटामध्ये वरुण धवन सलमान खानची भूमिका वठवू शकेल का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. ‘जुडवा ’ या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान, अभिनेत्री रंभा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यामुळे नाही म्हटले तरीही वरुणसमोर हे एक प्रकारचे आव्हान आहे असेच म्हणावे लागेल. याआधी वरुणने त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनात ‘तु मेरा हिरो’ या चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत झळकणार असणाऱ्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने याआधी  ‘ढिशूम’ या चित्रपटात वरुणसह काम केले होते. तर अभिनेत्री तापसी पन्नूही तिच्या ‘पिंक’ या चित्रपटातील अभिनयामुळे प्रकाशझोतात आली होती. या चित्रपटामध्ये करिश्मा कोणती भूमिका साकारणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 7:16 pm

Web Title: karisma kapoor to romance salman khan in judwaa 2
Next Stories
1 ‘नाम शबाना’ फर्स्ट लूक: तापसी ठेवतेय अक्षयच्या पावलावर पाऊल
2 ‘बरेली की बर्फी’ घेऊन येणार आयुषमान आणि क्रिती
3 ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून शाहरुखला बोलावणे!
Just Now!
X