15 December 2017

News Flash

करिष्माच्या प्रियकराबद्दल बोलले बाबा रणधीर

करिष्मा तिच्या कथित प्रियकर संदीप तोष्णीवालसोबत संसार मांडायला तयार

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 6:03 PM

अभिनेत्री करिश्मा आणि संदीप तोश्नीवाल

करिष्माचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर आणि प्रिया सचदेव हे काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. आता करिष्माही तिच्या कथित प्रियकर संदीप तोष्णीवालसोबत संसार मांडायला तयार झाल्याची चर्चा सिनेवर्तुळात होत आहे. पण त्यांच्या लग्नासाठी करिष्माच्या चाहत्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हे आम्ही नाही तर करिष्माचे बाबा रणधीर कपूरच सांगत आहेत. ‘डीएनए’ला दिलेल्या एका मुलाखतीत रणधीर यांनी करिष्मा सध्या फार खूश आहे. तिला जिथे असायला हवे होते तिथे ती आहे, पण लग्न करण्याचा तिचा सध्या कोणताही विचार नाही.

लोलो सध्या खूप खूश आहे. मी कधीच तिला तिच्या लग्नाबद्दल विचारले नाही. पण जर तिचा लग्न करण्याचा विचार असेल तर माझे आशीर्वाद नेहमीच तिच्या पाठीशी असतील. पण मला नाही वाटत तिला सध्या तरी लग्न करायचं आहे. करिश्मा आता तिच्या आयुष्यात स्थिरस्थावर झाली आहे. ती तिच्या मुलांची काळजीही उत्तमरित्या घेते. ती एक आदर्श आई आहे. करिनाही तिच्या आयुष्यात स्थिरस्थावर झाली आहे. सैफ तिची खूप काळजी घेतो. तो उत्तम माणूस आणि आदर्श जावई आहे.

#happy70th❤️#weloveyoupapa😇

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

💁🏻#classic#casualchic#comfortfirst#braidedpony#printedpumps#beingme

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

First Published on April 21, 2017 5:57 pm

Web Title: karisma kapoors father randhir kapoor talks boyfriend sandeep toshniwal