News Flash

करिष्माचा तथाकथित प्रियकर बनला कपूर कुटुंबाचा सदस्य?

कपूर कुटुंबातर्फे आलिशान पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या काही महिन्यांपासून संदीप आणि करिश्मा यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

बॉलीवूडमध्ये एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री करिष्मा कपूर आणि तिचा तथाकथित प्रियकर संदीप तोष्णीवाल सध्या चर्चेत आले आहे. पण, या दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल काहीच खुलासा केलेला नाही. काही दिवसांपूर्वीच करिष्मा आणि संदीप हे दोघेही करिना कपूर खान हिच्या घराबाहेर दिसले होते. त्यानंतर कपूर कुटुंबाने नुकत्याच दिलेल्या आलिशान पार्टीतही संदीप उपस्थित असल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये पाहावयास मिळतेय. बुधवारी रणधीर कपूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कपूर कुटुंबातर्फे आलिशान पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या काही महिन्यांपासून संदीप आणि करिश्मा यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. घटस्फोटानंतर करिष्मा आणि संदीप ‘लिव्ह इन-रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचे देखील म्हटले जातेय. पण, अद्याप या दोघांनीही एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. मात्र रणधीर कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये संदीपचा ज्याप्रमाणे वावर होता त्यावरून तो कपूर कुटुंबाचा सदस्य बनला आहे असे दिसतेय. स्पॉटबॉय डॉट कॉम या संकेतस्थळाने सदर पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहता बहुधा कपूर कुटुंबाने करिष्मा आणि संदीपच्या नात्याला स्वीकारले असून संदीप त्यांच्या घराचा सदस्य बनल्याचे दिसते.

करिष्माने गेल्या वर्षी दिल्ली स्थित व्यावसायिक संजय कपूर याच्याशी घटस्फोट घेतला होता. तब्बल १३ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना समायरा कपूर आणि किआन राज कपूर ही दोन मुले आहेत. संजयशी घटस्फोट घेतल्याच्या काही दिवसांनंतरच करिष्मा आणि संदीपच्या नात्याविषयी चर्चा होण्यास सुरुवात झाली.

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal-seated-together-at-randhir-kapoors-70th-birthday-bash-1

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal-with-babita-mingling-around-at-randhir-kapoors-70th-birthday-bash-2

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal-with-her-father-and-others-at-randhir-kapoors-70th-birthday-bash-7

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal-with-mother-babita-at-randhir-kapoors-70th-birthday-bash-3

karisma-kapoor-introducing-sandeep-toshniwal-to-her-father-and-others-at-randhir-kapoors-70th-birthday-bash-6

रणधीर यांच्या ७० व्या वाढदिवसामुळे कपूर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. करिष्मा आणि करिनामुळे या पार्टीला आणखीनच रंगत आली होती. या ग्रॅण्ड पार्टीचे स्वतः कपूर बहिणींनी आयोजन केले होते. कपूर कुटुंबियांची पार्टी म्हटलं की अनेकांनाच त्या पार्टीबद्दल उत्सुकता लागून राहते. विविध कार्यक्रमांना आणि सणांना कपूर कुटुंबिय एकत्र येऊन तो आनंद साजरा करतात. त्यामुळे चित्रपटसृष्टीत इतके मोठे कुटुंब असताना या ग्रॅण्ड कपूर फॅमिलीला फार क्वचितच इतरांची गरज लागते. रणधीर कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतही असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर रणधीर कपूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे फोटो पाहायला मिळत आहेत. या पार्टीमध्ये खुद्द रणधीर कपूर यांचा उत्साहही पाहण्याजोगा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 4:39 pm

Web Title: karisma kapoors rumoured boyfriend sandeep toshniwal a part of kapoor family
Next Stories
1 कंगनाच्या धमाकेदार एण्ट्रीने ‘रंगून’ गेला 2 MAD चा मंच
2 पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर सलमानला म्हणाली, ‘छिछोरा’
3 बाबा गुरमीत राम रहीमच्या चित्रपटाने ‘जॉली’ अक्षयलाही टाकले मागे
Just Now!
X