16 October 2019

News Flash

Photo : करिष्माने दिला सलमानसोबतच्या आठवणींना उजाळा

'बीवी नंबर १', 'दुल्हन हम लें जाऐंगे', 'हम साथ साथ है' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये सलमान आणि करिष्माने स्क्रीन शेअर केली आहे.

करिष्मा कपूर, सलमान खान

बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री करिष्मा कपूरचा आता म्हणावा तसा चंदेरी दुनियेमध्ये वावर राहिलेला नाही. गेल्या अनेक वर्षापासून करिष्मा एकाही बॉलिवूड चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकलेली नाही. मात्र तरीदेखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती अनेक वेळा फोटो, व्हिडिओज शेअर करत असते. यावेळी करिष्माने तिच्या जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. करिष्माने इन्स्टाग्रामवर अभिनेता सलमान खानबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

‘बीवी नंबर १’, ‘दुल्हन हम लें जाऐंगे’, ‘हम साथ साथ है’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये सलमान आणि करिष्माने स्क्रीन शेअर केली आहे. त्याकाळी चाहत्यांमध्ये ही सर्वात लोकप्रिय जोडी ठरली होती. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी करिष्माने हा फोटो शेअर केला असून सध्या हा फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

Hitchhiking in which film ? #guessinggame #flashbackfriday @beingsalmankhan

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

दरम्यान, काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला शाहरुख खानच्या झीरो या चित्रपटामध्ये करिष्मा कॅमियो रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त गेल्या अनेक वर्षात करिष्मा अन्य कोणत्याही चित्रपटात झळकलेली नाही. तर सलमान खान त्याच्या आगामी भारत चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

First Published on January 12, 2019 1:24 pm

Web Title: karisma kapoors throwback picture with actor salman khan