17 January 2021

News Flash

कंगनाविरोधात FIR दाखल करा; कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

वाचा कोणत्या प्रकरणी दिले न्यायालयानं निर्देश

संग्रहित

कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्वीटसाठी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयानं शुक्रवारी पोलिसांना हे आदेश दिले. वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावरणी दरम्यान न्यायालयां क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना कंगनाच्या विरोधा एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

“आपण दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयानं पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास तसंच याप्रकरणी तपास करण्याचे निर्देश दिले असल्याचे वकील रमेश नाईक यांनी सांगितलं. विधेयकांचं कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी राज्यसभेत कृषी विषयक दोन्ही विधेयके मंजूर करण्यात आली होती. काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला. तर, दिल्ली, हरयाणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आलं होतं. त्यांच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही देखील दिली. यावर आता अभिनेत्री कंगना रणौत हिने मोदींच्या ट्वीटला रिट्वीट करत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आणि या विधेयकांना विरोध करणाऱ्यांवर टीका केली होती.

काय म्हणाली होती कंगना?

“कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं सोंग करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले. अशा शब्दांमध्ये ट्विट करत कंगना रणौतने या विधेयकांचा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 11:43 am

Web Title: karnataka court directs police to book fir kangana ranaut over her anti farmer tweet jud 87
Next Stories
1 ४५ यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस उलटली
2 कर्ज हफ्त्यांवरील स्थगिती अजून वाढवू शकत नाही, न्यायालयाने हस्तक्षेप करु नये – केंद्र सरकार
3 VIDEO: चीन पाकिस्तानविरोधात भारताने बनवलं ‘रूद्रास्त्र’
Just Now!
X