सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’ चित्रपटाच्या बाजूने निकाल देऊनही करणी सेनेची भूमिका मात्र बदललेली नाही. सुरुवातीपासूनच भन्साळींच्या या स्वप्नवत प्रोजेक्टला असलेला करणी सेनेचा विरोध तसुभरही कमी झाला नाही. किंबहुना दिवसागणिक नव्या पद्धतीने विरोधाच्या या आगीचा आणखी भडका उडत असल्याचे पाहायला मिळतेय. अनेक मार्गांनी ‘पद्मावत’चा विरोध करणाऱ्या करणी सेनेने आता थेट सैन्यदलातील जवानांनाही या प्रकरणात खेचले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पद्मावत’ला विरोध करण्यासाठी भारतीय सैन्यदलात असणाऱ्या क्षत्रिय समाजातील जवानांनी एका दिवसाच्या अन्नावर बहिष्कार टाकत अन्नत्याग करावा, असे आवाहन करणी सेनेच्या महिपाल सिंह मकराना यांनी केले आहे. ‘देशाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर असणाऱ्या जवानांनी राणी पद्मिनीच्या संरक्षणासाठी पुढे यावे. कारण हा तुमच्या बहिणींच्या सन्मानाचा प्रश्न आहे’, असे म्हणत मकराना यांनी ही अजब मागणी केली. सोबतच त्यांनी सरकारला नमवण्यासाठी जवानांना एका दिवसासाठी त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवण्याचेही आवाहन केले.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

करणी सेनेची ही आक्रमक भूमिका आणि त्यांचा पवित्रा पाहता ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर संकटांचे सावट आल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वोच्च न्यायालय आणि सेन्सॉरच्या निर्णयांनाही बाजूला सारत आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या करणी सेनेने सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या प्रसून जोशी यांना जयपूरमध्ये येण्यास बंदी घातली आहे. जयपूरमध्ये आलात तर तुमचेही भन्साळींप्रमाणेच ‘स्वागत’ करु असा इशारा जोशी यांना देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karni sena asks kshatriya jawans to boycott mess food to protest bollywood movie padmaavat release sanjay leela bhansali
First published on: 21-01-2018 at 14:22 IST