30 September 2020

News Flash

अरबाज खानची गर्लफ्रेंड ‘या’ वेब सीरिजमध्ये दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत

याआधी जॉर्जिया सलमान खानच्या दबंग-३ या चित्रपटामुळे चर्चेत होती.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी आता लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कॅरोलीन कामक्षी (karoline kamakshi) असं या आगामी वेब सीरिजचे नाव आहे. या वेब सीरिजमध्ये जॉर्जिया एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे.

‘कॅरोलीन कामक्षी’ ही एक तामिळ वेबसीरिज आहे. ज्यात जॉर्जिया कॅरोलीन नावाच्या एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. जॉर्जियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कॅरोलीन कामक्षी’चा टिझर शेअर करुन याबाबत माहिती दिली. जॉर्जिया सलमान खानचा भाऊ अरबाज खान याची गर्लफ्रेंड असल्यामुळे काही तासात तिच्या या पोस्टवर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही वेब सीरिज येत्या पाच डिसेंबरपासून झी-५ या अॅपवर सुरु होणार आहे.

 

View this post on Instagram

 

The start of my new obsession for sarees #saree #sareelover #whiteembroidery @makeupbydimpllesbathija

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22) on

याआधी जॉर्जिया सलमान खानच्या दबंग-३ या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटातून ती आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणार अशी चर्चा होती. परंतु त्यानंतर तिने ‘श्रीदेवी बंगलो’ हा तामिळ चित्रपट स्वीकारला आणि आता ती वेब सीरिजमध्ये देखील पदार्पण करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 5:07 pm

Web Title: karoline kamakshi arbaaz khan girlfriend giorgia andriani mppg 94
Next Stories
1 MMS मुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पोस्ट केले बोल्ड फोटो
2 ..अन् सेटवरच रणबीर-दीपिकाचे डोळे पाणावले
3 चित्रपट दिग्दर्शकाचं धक्कादायक विधान; लैगिंक अत्याचारांना महिलाही जबाबदार
Just Now!
X