बॉलिवूडमध्ये सतत अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतात. आता या अफेअरच्या चर्चांच्या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्याचे नाव नोंदण्यात आले आहे. हा अभिनेता सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत असून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता कार्तिक आर्यन आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्तिकचे नाव ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वेळा कार्तिक आणि साराला एकत्र डिनर डेटवर जाताना कॅमेरामध्ये कैद करण्यात आले होते. इतकच नव्हे तर कार्तिकने साराच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढला होता. तेव्हापासून सारा आणि कार्तिकच्या अफेअरच्या चर्चांना उधाण मिळाले आहे. मात्र नुकताच कार्तिकने एका फोटोग्राफरला केलेल्या विनंतीमुळे सर्वांना धक्का बसला आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानूसार कार्तिकने फोटोग्राफरला त्याचे आणि साराचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे. ‘कामा व्यतिरिक्त मी आणि सारा बाहेर फिरत असतो तेव्हा फोटोग्राफरने आमचे फोटो काढू नयेत ही माझी विनंती आहे’ असे कार्तिक म्हणाला आहे. कार्तिकने त्या मागील कारण देखील सांगितले आहे. ‘साराचा बॉयफ्रेंड म्हणून मला ओळखण्यापेक्षा मला माझ्या कामामुळे ओळखले जावे अशी माझी इच्छा आहे’ असे पुढे कार्तिक म्हणाला आहे.

आणखी वाचा : ‘वॉर’नंतर हृतिक लवकरच दिसणार ‘क्रिश ४’ चित्रपटात

साराने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅटशोमध्ये कार्तिक आवडत असल्याची कबूली दिली होती. तेव्हा पासून कार्तिक आणि साराच्या नात्याच्या चर्चांना उधाण मिळाले होते. त्यानंतर दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी त्यांच्या आगमी चित्रपटामध्ये कार्तिक आणि साराला कास्ट केले. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे. कार्तिक लवकरच ‘पति पत्नी और वो’चे चित्रीकरण झाल्यानंतर ‘भूल भुलैया’च्या रिमेकसाठी काम करणार आहे. तर सारा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवनसह दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karthik aryan does not want to be called as saras boyfriend avb
First published on: 14-10-2019 at 14:16 IST