30 October 2020

News Flash

कार्तिक आर्यनने आईला दिले ४० लाखांचे गिफ्ट

हे गिफ्ट कार्तिकने वाढदिवसा निमित्त दिले आहे

आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. नुकताच कार्तिकने त्याची आई माला तिवारी यांचा १६ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा केला. आईचा वाढदिवस आणखी खास करण्यासाठी कार्तिकने आईला स्पेशल गिफ्ट दिले आहे.

कार्तिकने आईला ‘मिनी कूपर’ कार गिफ्ट दिली आहे. या कारची किंमत तब्बल ४० लाख रुपये असून ही हिरव्या रंगाची कार आहे. कार गिफ्ट केल्यानंतर कार्तिक आणि त्याची आई दोघेही लाँग ड्रायवर जाताना दिसले होते.

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्तिकने एक जुना फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या लहानपणीच्या फोटोमध्ये कार्तिक अत्यंत क्यूट दिसत असून त्याच्या आईने त्याची छान हेअरस्टाईल देखील केली असल्याचे दिसत आहे. तसेच आईने त्याला कडेवर उचलून घेतले आहे. कार्तिकने फोटो शेअर करत ‘माझ्या आवडत्या हेअरस्टाइलिस्टला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लव्ह यू आई’ असे कॅप्शन दिले.

 

View this post on Instagram

 

Happy Birthday to my Fav Hairstylist Love you Mummy

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

आईच्या वाढदिवशीच कार्तिकचा आगामी चित्रपट ‘लव्ह आज कल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. कारण खऱ्या खुऱ्या आयुष्यात सारा आणि कार्तिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 10:50 am

Web Title: karthik aryan gifted mother a mini cooper car worth rs 40 lakh on her birthday avb 95
Next Stories
1 Video : आवडत्या अभिनेत्रीची झलक पाहण्यासाठी पाच दिवस रस्त्यावर मुक्काम
2 Birthday Special : आवाज ऐकूनच अबू सालेमच्या प्रेमात पडले- मोनिका बेदी
3 मानधनाच्या बाबतीत प्रवीण तरडे मराठीतील सुपरस्टार
Just Now!
X