News Flash

१ लाख रुपये विजेचे बिल पाहून अभिनेत्री संतापली, ट्विट करत म्हणाली…

तिने सोशल मीडियापोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश करोना या महामारीशी लढत आहे. करोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. आता हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच एका अभिनेत्रीला विजेचे जवळपास एक लाख रुपये बिल आले आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे

ही अभिनेत्री म्हणजे कार्तिका नायर आहे. तिने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ‘हा कोणत्या प्रकारचा घोटाळा अडानी इलेक्ट्रिसिटीकडून मुंबईत केला जात आहे? माझ्या घराचे जून महिन्यातील इलेक्ट्रिसिटीचे बिल जवळपास १ लाख रुपये आले आहे (लॉकडाउनमुळे त्यांनी मिटर रिडिंग घेतलेली नाही) अशा अनेक तक्रारी मुंबईकरांकडून ऐकल्या आहेत’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अडानी इलेक्ट्रिसिटीने यावर उत्तर देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्यात येईल असे म्हटले आहे. कार्तिका नायरने अभिनेता जूनिअर एनटीआरसोबत ‘दम्मू’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नागा चैतन्यसोबत ‘जोश’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 1:49 pm

Web Title: karthika nair received rs 1 lakh electricity bill avb 95
Next Stories
1 करोनामध्ये इंटिमेट सीन कसे होणार शूट?; फोटो शेअर करत अभिनेत्यानं दिलं उत्तर
2 “नामांकित अभिनेता असतानाही मला…”; वर्णद्वेषाबद्दल सांगताना ‘अ‍ॅव्हेंजर्स’मधील अभिनेता रडला
3 अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, नेटकऱ्यांची मागणी
Just Now!
X