News Flash

Luka Chuppi Trailer : लग्नाआधी कार्तिक-कृतीची ‘लुका छुप्पी’

कार्तिक-किर्तीच्या 'लुका छुपी'चा ट्रेलर प्रदर्शित

कार्तिक आर्यन आणि किर्ती सनॉन यांच्या लुका छुपी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा कॉमेडी चित्रपट १ मार्च २०१९ रोजी  प्रदर्शित होणार आहे. लग्नाआधी लिव्हइन मध्ये राहणाऱ्या जोडप्याची कथा यात सांगितली आहे. ट्रलेरमध्ये कार्तिकला किर्तीसोबत लग्न करायचे असते. पण, असे काही घडते की दोघांच्या लग्नात लुका छुपी पहायला मिळते. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर करत असून दिनेश विजन निर्माते आहे.

या चित्रपटात कार्तिकने एक लोकल टीव्ही रिपोर्टरची भूमिका केली आहे. जेव्हा तो क्रितिला प्रपोज करायला जातो त्यावेळी ती त्याला लिव्हइन मध्ये राहण्याची अट घालते. त्यानंतर त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत राहू लागते आणि जो काही गोंधळ उडतो तो पाहण्यात नक्कीच मजा येणार आहे. ‘लुका छुप्पी’द्वारे कार्तिक आणि कृतीची फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. कार्तिक-कृतीसह अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सुरुवातीला ‘मथुरा लाइव्ह’ हे शीर्षक चित्रपटासाठी सुचवण्यात आलं होतं. मात्र अखेर ‘लुका छुपी’ हे नाव अंतिम करण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. कार्तिक आणि क्रिती ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ यांसारख्या चित्रपटांमधून कार्तिकने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 3:09 pm

Web Title: kartik aaryan and kriti sanon luka chuppi trailer launch
Next Stories
1 ‘…हीच त्यांची संस्कृती’, पानसेंना पाठींबा देत खोपकरांचा शिवसेनेला टोला
2 ‘अपमान करण्याला लाथ कशी मारावी तुझ्याकडून शिकावं’
3 ‘लहान मेंदूत कचरा साचला की..’, नाव न घेता संजय राऊतांचा पानसेंवर निशाणा
Just Now!
X