News Flash

करण जोहरच्या प्रतिस्पर्धी निर्मात्यासोबत कार्तिक आर्यन करणार काम?

कार्तिकच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी..

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता कार्तिक आर्यन ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांपासून दोस्ताना २ या चित्रपटामुळे कार्तिक चर्चेत आहे. कार्तिकच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं कारण धर्मा प्रोडक्शनने दिलं होतं. त्यानंतर कार्तिकच्या चाहत्यांसमोर अनेक प्रश्न होते की कार्तिक आता कोणत्या चित्रपटात दिसेल. तर कार्तिकच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक म्हणजे साजिद नाडियाडवाल यांच्यासोबत आता कार्तिक काम करणार आहे. साजिद यांना बऱ्याच काळापासून कार्तिकसोबत काम करायचे होते. अखेर साजिदयांना कार्तिकसाठी एक उत्तम भूमिका मिळाली आहे. या भूमिकेत कार्तिक फिट होईल. दरम्यान, त्यांनी कार्तिकशी या चित्रपटासाठी चर्चा देखील केली आहे. साजिद यांच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक समीर विद्धवंस करणार आहेत, असे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

या चित्रपटासाठी काम करत असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “कार्तिक आर्यन चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो, म्हणून साजिद हे कार्तिकसाठी एका लव्हस्टोरीच्या शोधात होते. आता त्यांना लव्हस्टोरी मिळाली असून त्यात त्यांनी कार्तिकला घेण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिकने आता पर्यंत जितक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यापेक्षा ही भूमिका थोडी हटके असणार आहे.”

आणखी वाचा : Birthday Special : पर-पुरूषांसोबत सनीचे पॉर्न फिल्ममध्ये काम करणे डॅनियलला नव्हते पसंत म्हणून..

या चित्रपटाची निर्मिती ही साजिद नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट आणि नमा: पिक्चर्स करणार आहेत. कार्तितसोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार याची चर्चा अजूनही सुरु आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 11:49 am

Web Title: kartik aaryan bags his first film after the exit from karan johars dostana 2 its an epic love story dcp 98
Next Stories
1 सनी लिओनी आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण, जाणून घ्या तिच्या संपत्ती विषयी
2 Birthday Special : पर-पुरूषांसोबत सनीचे पॉर्न फिल्ममध्ये काम करणे डॅनियलला नव्हते पसंत म्हणून..
3 भाईजानने चाहत्यांकडूनच मागितली कमिटमेंट, राधेच्या रिलीजपूर्वी सलमानने शेअर केला व्हिडीओ
Just Now!
X