बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन व अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या ‘पत्नी पती और वो’ या चित्रपटाचे लखनऊमधील चित्रीकरणात नुकतेच पूर्ण झाले. गेले अनेक महिने सुरु असलेले चित्रीकरण अखेर पुर्ण झाले, हा आनंद त्यांनी केक कापून व्यक्त केला. या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट केक कापत असतानाचा एक व्हिडीओ अभिनेत्री अनन्या पांडे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये कार्तिक अनन्याच्या तोंडावर केल लावताना दिसत आहे. या पोस्टच्या खाली तिने “सूडाची चव कधी गोड नसते कार्तिक आर्यन… पारंपरिक जेवण व माझ्यावर भरपूर केलेल्या प्रेमासाठी धन्यवाद लखनऊ” असे लिहिले आहे. याआधी अनन्याने कार्तिकच्या तोंडावर केक लावला म्हणून आता कार्तिकने तिच्या तोंडावर केक लावून बदला घेतला. सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असलेल्या या व्हिडीओवर ७ लाख ७१ हजारांपेक्षा अधिक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.
‘पत्नी पती और वो’ या चित्रपटात कार्तिक व अनन्याबरोबरच अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील दिसणार आहे. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पत्नी पती और वो’ या विनोदीपटाचा हा रिमेक आहे. १० जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2019 1:58 pm