सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे दोघंही सध्या ‘लव्ह आज कल’च्या सीक्वलमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटातील किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता. या व्हायरल व्हिडिओबद्दल पहिल्यांदाच कार्तिकनं मौन सोडलं आहे.

या व्हिडिओत दिसणारं जोडपं खरंच सारा आणि मी असल्याचं तुम्हाला वाटतं का? या व्हिडिओच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास खूपच वाव आहे अशी प्रतिक्रिया त्यानं बॉलिवूड लाइफशी बोलताना दिली आहे. एकप्रकारे या व्हिडिओत दिसणारं जोडपं मी आणि सारा असल्याचं कार्तिकनं अमान्य केलं आहे.

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जेव्हा अभिनेत्री सारा अली खानने कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून कार्तिक-साराचं नावं अनेकदा जोडलं गेलं आहे. रणवीर सिंगने पुढाकार घेत या दोघांची पहिली भेट घडवून आणली होती. हे दोघंही इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल २’ मध्ये काम करत आहेत. २००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. या चित्रपटात सैफ अली खान, दीपिका पादुकोनची प्रमुख भूमिका होती.