22 November 2019

News Flash

कार्तिक आर्यनने विकत घेतले पेईंग गेस्ट म्हणून राहत असलेलं घर

याच घरात तो सुरुवातीच्या काळात १२ स्ट्रगलर्ससोबत राहत होता.

कार्तिक आर्यन

‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता कार्तिक आर्यन आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ आणि ‘लुका छुपी’ या सुपरहिट चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांचा आकडा आणखीनच वाढला आहे. पण कार्तिक आर्यनसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. पहिल्याच ऑडिशनला त्याला नकार पचवावा लागला होता. इतकंच नव्हे तर सुरुवातीच्या काळात तो मुंबईत 2 BHK फ्लॅटमध्ये १२ स्ट्रगलर्ससोबत राहत होता. आता हेच घर कार्तिकने विकत घेतलं आहे.

कार्तिकने वर्सोवामध्ये घर विकत घेतलं आहे. या घराची किंमत १.६० कोटी रुपये असल्याचं समजतंय. हे घर फार मोठं नसलं तरी कार्तिकचं हे मुंबईतलं पहिलं हक्काचं घर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही फार खास गोष्ट आहे.

आणखी वाचा : आलिया पोटात असताना सिगारेट ओढल्या- सोनी राजदान

‘लुका छुपी’नंतर कार्तिक सध्या त्याच्या आगामी ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर भूमिका साकारणार आहेत. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या बी. आर. चोप्रा यांच्या ‘पती पत्नी और वो’चा हा रिमेक आहे.

First Published on July 11, 2019 3:20 pm

Web Title: kartik aaryan buys house where he once lived as paying guest ssv 92
Just Now!
X