01 March 2021

News Flash

Video: ‘लव्ह आज कल २’च्या सेटवर का रडतोय कार्तिक आर्यन?

हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

इम्तिआज अलीच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या सीक्वलचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. हिमाचलमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. नुकतंच इम्तिआज अलीने सोशल मीडियावरून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली. त्याने टीमसोबतचे काही फोटो सुद्धा शेअर केले आहेत. या चित्रपटात सारा अली खान व कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत झळकणार असून त्यांनीही इम्तिआजचे आभार मानण्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

शूटिंगच्या शेवटच्या दिवशी इम्तिआजला घट्ट मिठी मारून कार्तिक रडतोय असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. करियरच्या सुरुवातीलाच इम्तिआज अलीसारख्या प्रथितयश दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी कार्तिकला मिळाली. आता कार्तिक ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटात अनन्य पांडे व भूमी पेडणेकरसोबत डोसणार आहे. याशिवाय ‘दोस्ताना २’ मध्येही तो जाह्नवी कपूरसोबत झळकणार आहे. इम्तिआजसोबतचे त्याचे भावनिक नाते या व्हिडीओतून दिसून येत आहे. “जेव्हा वीरा म्हणते की, हा रस्ता खूप छान आहे. मला असं वाटतंय की हा रस्ता संपूच नये.” असे काहीसे इम्तिआज सरांसोबत शूट करताना वाटते.’ असे त्याने लिहिले आहे.

अभिनेता रणदीप हु़ड्डासुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. त्यानेही या चित्रपटाचे शूटिंग संपल्याचे जाहीर करत काही फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. ‘६६ दिवस आणि अनेक आठवणी’ असे त्याने लिहिले आहे.

हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 12:53 pm

Web Title: kartik aaryan love aaj kal 2 imtiaz ali djj 97
Next Stories
1 Mumbai Rain : टीव्ही इंडस्ट्रीलाही पावसाचा फटका, मालिकांचे शूटिंग रद्द
2 ..म्हणून झायरावर चिडल्याचा रवीनाला होतोय पश्चाताप
3 अमिताभ बच्चन म्हणतायेत, ‘मी नाहीये बिग बी’
Just Now!
X