29 October 2020

News Flash

कार्तिक आर्यन करतोय का सारा अली खानला मिस ?

अभिनेता कार्तिक आर्यन आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

कार्तिक आर्यन

‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता कार्तिक आर्यन आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ आणि ‘लुका छुपी’ या सुपरहिट चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांचा आकडा आणखीनच वाढला आहे. एका चॅट शोमध्ये साराने तिला अभिनेता कार्तिक आर्यन फार आवडत असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनच या दोघांची खूप चर्चा झाली. आता तर ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांसाठी इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहिली होती.

सारा अली खान तिच्या कुटुंबीयांसोबत लंडनला गेली असताना कार्तिकने त्याच्या सोशल मीडियावर एक दुःखी फोटो शेअर केला आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. कार्तिकने या फोटोला दिलेले कॅप्शनसुद्धा तितकेच चपखल आहे. ‘जर ‘आय मिस यु’ या वाक्याला चेहरा असेल तर’ असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यावरून त्याला इंस्टाग्राम युझर्सनी साराच्या नावाने चिडवले आहे.

या दोघांच्याही चाहत्यांना असे वाटत आहे की, कार्तिक सारालाच मिस करत आहे. कार्तिक तिला भेटण्यासाठी एअरपोर्टवरदेखील गेला होता. कार्तिक लखनऊला शूटिंगसाठी गेला असताना सारा देखील त्याला सोडण्यासाठी एअरपोर्टवर आली होती.

सध्या कार्तिक भूमी पेडणेकर, अनन्या पांडे यांच्यासोबत ‘पती, पत्नी और वो’ चित्रपटाचे शूटिंग लखनऊमध्ये करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 2:20 pm

Web Title: kartik aaryan sad face i miss you face sara ali khan djj 97
Next Stories
1 लवकरच उलगडणार राजमाता जिजाऊंचा प्रेरणादायी प्रवास
2 ही अभिनेत्री खातेय ‘फायर पान’, व्हिडीओ व्हायरल
3 करिनाच्या ‘या’ बॅगची किंमत ऐकाल तर व्हाल थक्क!
Just Now!
X