News Flash

…तेव्हा झहीरच्या पत्नीसाठी कार्तिकने बॅरिकेट्सवरुन मारली होती उडी

कार्तिकने सांगितला १२ वर्षांपूर्वीचा रंजक किस्सा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. या कालावधीत फोटो, व्हिडीओ शेअर करुन तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सोबतच त्याच्या जीवनातील अनेक रंजकदार किस्सेही सांगत आहे. यातच सध्या कार्तिकने शेअर केलेल्या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोत त्याने आवडत्या अभिनेत्रीसोबत फोटो काढण्यासाठी चक्क बॅरिकेट्सवरुन उडी मारल्याचं त्याने सांगितलं आहे.

कार्तिकने शेअर केलेला फोटो १२ वर्षांपूर्वीचा असून या फोटोत तो अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे सागरिकासोबत एक फोटो काढता यावा यासाठी त्याने चक्क बॅरिकेट्सवरुन उडी मारली होती.

“२००८ मुंबई मॅरेथॉन. प्रिती सबरवालसोबत फोटो काढण्यासाठी मी बॅरेकेट्सवरुन उडी मारली होती. आणि तिला सांगितलं होतं शाहरुख खानला माझ्याकडून हाय कर, असं मी तिला सांगितलं होतं”, असं कार्तिकने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सागरिका घाटगेने ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात प्रिती सबरवाल ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं होतं. इतकंच नाही तर ती अनेक तरुणांची क्रशही झाली होती. सागरिकाने २०१७ मध्ये क्रिकेटपटू जहीर खानसोबत लग्नगाठ बांधली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:46 pm

Web Title: kartik aaryan shares throwback photo with sagrika ghatge says i took selfie by jumping barricades ssj 93
Next Stories
1 विठू नामाच्या गजरात एकरूप होण्यासाठी झी टॉकीजवर खास कार्यक्रम!
2 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘लूटकेस’, पण या कारणामुळे कुणाल खेमू नाराज
3 ‘सडक २’चे पोस्ट प्रदर्शित होताच महेश भट्ट झाले ट्रोल
Just Now!
X