‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. सारा आणि कार्तिकचे एकत्र फिरतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यातच कार्तिकने असे काही केले आहे ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण मिळाले आहे.

कार्तिक आर्यन नुकताच काही कामा निमित्त साराच्या घरी गेला होता. साराच्या घरातून बाहेर पडताना कार्तिकला कॅमेरामध्ये कैद करण्यात आले. यावेळी कार्तिकने माध्यमांच्या कॅमऱ्यांपासून स्वत:ला लपण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा हा प्रयत्न असफल झाला. कार्तिकने यावेळी काळ्या रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला होता. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/Bw6mjTxjLal/?utm_source=ig_web_copy_link

कॉफी विथ करण या करण जोहरच्या चॅट शोमध्ये सारा अली खानला पाहुणी म्हणून बोलावण्यात आले होते. त्यादरम्यान साराने कार्तिकला डेट करायला आवडेल असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून सारा आणि कार्तिकच्या नात्याची चर्चा सुरू झाली.

सारा आणि कार्तिक इम्तियाज अली यांच्या ‘लव आजकल २’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरणम दिल्लीमध्ये आहे. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचे सारा आणि कर्तिकचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.