News Flash

कार्तिकने सांगितला ‘दिल बेचारा’मधील आवडता सीन; दुसऱ्यांदा पाहणार चित्रपट

‘दिल बेचारा’मुळे कार्तिकच्या डोळ्यांतून वाहू लागले अश्रू

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावूक झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान अभिनेता कार्तिक आर्यन याने देखील ‘दिल बेचारा’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. तो हा चित्रपट दुसऱ्यांदा पाहणार आहे.

“सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

कार्तिकने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ‘दिल बेचारा’वर कौतुकाचा वर्षाव केला. त्याला या चित्रपटातील एक सीन प्रचंड आवडला. जेव्हा मॅडीसमोर किजी शेवटचं भाषण करते, तो पाहून कार्तिक भावूक झाला. या एका सीनसाठी तो ‘दिल बेचारा’ हा चित्रपट पुन्हा एकदा पाहणार आहे. त्याने या सीनचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“दान नकोय आम्हाला काम हवय”; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या

 

View this post on Instagram

 

This Scene #DilBechara #WatchingAgain

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह बंद आहेत. परिणामी ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. मात्र तरीही चित्रपटाला आश्चर्यचकित करणारा प्रतिसाद मिळाला. ‘दिल बेचारा’ या चित्रपटाला २४ तासांत ९५ दशलक्ष व्हूज मिळाले. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीने देखील १० पैकी १० रेटिंग दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 1:16 pm

Web Title: kartik aaryan tweet sushant singh rajput dil bechara mppg 94
Next Stories
1 ‘आशिकी’चे गाणे या पाकिस्तानी गाण्याची कॉपी? विवेक अग्नीहोत्रीने शेअर केला व्हिडीओ
2 VIDEO : ..अन् माणसांना पाहून सिंह पळू लागले; बिग बींनी सांगितला ‘तो’ अनुभव
3 Gunjan Saxena Trailer: कारगिल युद्धातील पराक्रमाची कथा
Just Now!
X