17 January 2021

News Flash

अभिनेत्याने खरेदी केले नवे घर, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

अनेक कलाकरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता मोहसिन खान म्हणजे ‘कार्तिक गोयंका’ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो सतत त्याचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी त्याने नवे घर खरेदी केले आहे. याबाबतची माहिती त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

नुकताच मोहसिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन घरातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘नव्या घरातून दिसणारा देखावा..’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. मोहसिनने हे नवे घर कुठे खरेदी केले आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सोशल मीडियावर त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohsin Khan (@khan_mohsinkhan)

आणखी वाचा- अनुप जलोटा यांचा ‘सत्य साईबाबा’ चित्रपटातील लूक व्हायरल

सध्या मोहसिन ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत कार्तिक गोयंकाची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील मोहसिन आणि शिवांगी जोशी यांची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या चार वर्षांपासून मोहसिन या मालिकेत काम करत आहे. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोहसिनचे उर्वशी रौतेलासोबत एक गाणे रिलिज झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 11:57 am

Web Title: kartik aka mohsin khan buy new house and shares photo avb 95
Next Stories
1 वरूण धवन ‘या’ महिन्यात अडकणार लग्नबंधनात?
2 अनुप जलोटा यांचा ‘सत्य साईबाबा’ चित्रपटातील लूक व्हायरल
3 Video: ‘रसोडे में कौन था’ नंतर यशराजने तयार केला राखीवर व्हिडीओ
Just Now!
X