News Flash

पुन्हा एकदा कार्तिक-साराची चर्चा, हिमाचलमधील फोटो व्हायरल

सध्या बॉलिवूडमध्ये कार्तिक आणि सारा ही नवीन जोडी खूपच चर्चेत आहे

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही जोडी सतत चर्चेत असते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात सारा आणि कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान सारा आणि कार्तिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सारा आणि कार्तिक ही जोडी इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल २’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण हिमाचलमध्ये सुरु आहे. दरम्यान सारा आणि कार्तिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये साराने हिरव्या रंगाचा टॉप परिधान केला आहे तर कार्तिकने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. ते दोघे ही अत्यंत सुंदर अंदाजात दिसत आहेत. फोटोमधील सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

२००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका होती. आता त्याच चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सारा-कार्तिक मुख्य भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 11:49 am

Web Title: kartik aryan and sara ali khan photo of himachal is viral avb 95
Next Stories
1 ‘झिरो’नंतर चित्रपट न करण्यामागचं शाहरुखने सांगितलं कारण
2 करण जोहर ठरला 2019चा सर्वाधिक लोकप्रिय फिल्ममेकर !
3 ‘या’ अभिनेत्रीला दीपिका पदुकोणसोबत समलिंगी संबंध ठेवण्याची इच्छा
Just Now!
X