News Flash

सारासाठी काय पण! कार्तिकेने टाळलं लग्न

सारासोबत वेळ घालवण्यासाठी आणि डेटवर जाण्यासाठी कार्तिकने जाणे टाळले

सारासाठी काय पण! कार्तिकेने टाळलं लग्न

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. दोघांना अनेक वेळा एकत्र फिरताना पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक त्याचा आगामी चित्रपट ‘पती पत्नी और वो’च्या चित्रिकरणासाठी लखनऊला गेला होता. दरम्यान सारा कार्तिकला सरप्राईज देण्यासाठी दोन वेळा लखनऊला गेली असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार सारासोबत वेळ घालवण्यासाठी आणि डेटवर जाण्यासाठी कार्तिकने कामाचे दिलेले वचन देखील मोडले आहे. बालीमध्ये एका लग्न सोहळ्यात कार्तिक आर्यनला अभिनेत्री कतरिना कैफसोबत उपस्थित राहायचे होते. परंतु ऐनवेळी कार्तिकने या लग्न सोहळ्यात उपस्थिती राहण्यास नकार दिला. या लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधील इतर कलाकारदेखील येणार होते. कार्तिकला सारासोबत वेळ घालवायचा असल्यामुळे त्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला असावा अशा चर्चा सुरु आहेत.

साराने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅटशोमध्ये कार्तिक आवडत असल्याची कबूली दिली होती. तेव्हा पासून कार्तिक आणि साराच्या नात्याच्या चर्चांना उधाण मिळाले होते. त्यानंतर दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी त्यांच्या आगमी चित्रपटामध्ये कार्तिक आणि साराला कास्ट केले. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे. कार्तिक लवकरच ‘पति पत्नी और वो’चे चित्रीकरण झाल्यानंतर ‘भूल भुलैया’च्या रिमेकसाठी काम करणार आहे. तर सारा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवनसह दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 1:50 pm

Web Title: kartik aryan calls off to his commitment for sara ali khan avb 95
Next Stories
1 ‘तेरे नाम’च्या दिग्दर्शकाचं मराठीत पदार्पण
2 Bigg Boss Marathi 2: ‘फिनाले’मध्ये पोहोचले हे दोन स्पर्धक
3 शाहरुख खानवर आली काम मागण्याची वेळ?
Just Now!
X